
खवळलेले पित्त होईल क्षणार्धात शांत! रक्तात पित्ताची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, त्वरित करा घरगुती उपाय
शरीरात पित्त वाढण्याची कारणे?
पित्त कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पित्ताची पातळी का वाढते?
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरात पित्त वाढते. दैनंदिन आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ, आंबट ढेकर, त्वचेवर पुरळ तर काहीवेळा डोकेदुखीच्या त्रासाला सुद्धा सामोरे जावे लागते. मानवी शरीराचे आरोग्य तीन दोषांवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कोणता ना कोणता दोष असतोच. बऱ्याचदा उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरात नैसर्गिकरित्या अग्नी दोष वाढू लागतो. ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत आणि शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यातील अनेकांना जेवणानंतर किंवा जेवणाआधी घशात आंबट पाणी येणे, सतत ढेकर येणे तर काहीवेळा उलट्या, मळमळ होऊन आरोग्य बिघडून जाते. अॅसिडिटी वाढल्यानंतर कोणतेही काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडिटीचे प्रमाण वाढते आणि डोकेदुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. आयुर्वेदानुसार, शरीरातील पचनक्रिया, चयापचय, रक्ताभिसरण आणि शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पित्त दोष फार आवश्यक आहे. पण याच पित्ताची पातळी वाढल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला रक्तात पित्ताची पातळी वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? यावरील उपाय, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कधी दमट तर कधी उष्ण वातावरणामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात पित्ताची पातळी वाढल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. वाढलेल्या पित्ताचे परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतात. पित्त वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या आणून खातात. पण यामुळे काहीकाळापुरताच फरक पडतो. पण कालांतराने पुन्हा एकदा पित्ताची पातळी वाढते. खवळलेले पित्त शांत करण्यासाठी आणि रक्तातील उष्णता मुळापासून नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतील आणि खवळलेले पित्त शांत होण्यास मदत होईल.
रक्तात वाढलेले पित्त शांत करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यासाठी एक ग्लासभर थंड दूध प्यावे. थंड दूध प्यायल्यामुळे पोटातील हायड्रोक्लोरिक अॅसिड त्वरित शांत होते. याशिवाय एक चमचा तूप खाल्ल्यास पित्त शांत होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये तूप हे पित्तशामक म्हणून ओळखले जाते. याशिवाय वारंवार शरीरात पित्त वाढत असेल तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जिऱ्याचे पाणी प्यावे. पित्त झाल्यासारखे वाटल्यास चमचाभर बडीशेप किंवा जिरं चावून खावे. १ चमचाभर गुलकंद खाल्ल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल.
Ans: पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ, मळमळ, तोंडात कडूपणा, डोकेदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे ही पित्त वाढल्याची सामान्य लक्षणे असू शकतात.
Ans: तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन, अनियमित जेवण, तणाव, अपुरी झोप आणि उन्हात जास्त वेळ राहणे यामुळे पित्त वाढू शकते.
Ans: थंड ताक पिणे, कोमट पाण्यात धणे किंवा बडीशेप भिजवून त्याचे पाणी पिणे, नारळपाणी आणि आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.