Wedding Plan What Should Be The Budget For A Wedding What Things Should Be Kept In Mind
Wedding Plan : लग्न करताना बजेट कसा असावा ? काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?
तुम्हाला माहितेय का ? जर तुम्ही लग्नाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही बजेटमध्ये लग्न करु शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊयात.
लग्न म्हणजे फक्त आनंदाचा क्षण नाही तर भारतीय संस्कृतीत यावर प्रचंड खर्च केला जातो. घरात मुलगी जन्माला आली की आई वडिल तिच्या जन्मापासून तिच्या लग्नासाठी सेविंग्ज करायला सुरुवात करतात. म्हणजेच काय तर तिच्या लग्नाच्या खर्चाचा अंदाज घेत पैसै बाजूला काढतात. आताच्या पिढीचं सांगायचं तर लग्न करताना पहिले प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बजेटचा. पण तुम्हाला माहितेय का ? जर तुम्ही लग्नाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही बजेटमध्ये लग्न करु शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊयात.
लग्नात तुम्हाला तुमची हौस सर्वात जास्त महत्वाची वाटते की गरज हे आधी समजून घ्यायला पाहिजेत. या सगळ्याची यादी तुम्ही करुन ठेवली पाहिजेत.
लग्नासाठी गरजेच्या वस्तू नेमक्या कोणत्या ?
जाहिरात
जाहिरात
हॉल
जेवण
साड्या
दागिने
फोटोग्राफी
मेकअप
डेकोरेशन
तर हौसेच्य़ा गोष्टी कोणत्या त्याही आता पाहुयात ?
स्पेशल एंट्रीसाठी लागणाऱ्या गोष्टी
स्पेशल मोठमोठे शूट्स किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण
प्रत्येक कार्यक्रमासाठी महागडे डिझाईनर कपडे ही यादी तुम्ही काढून ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर महत्वाचं काय तर जास्तीत जास्त पैसे कसे वाचवता येईल.
लग्नाची तारीख निश्चित करताना ती साधारण 7-8 महिन्यानंतरची करा आणि त्याचवेळी त्वरीत हॉल आणि फोटोग्राफर निश्चित करा.
म्हणजे आयत्या वेळी जास्त पैसे घावे लागत नाहीत.
लग्न करताना इमरजेन्सीसाठी तुम्ही 10 टक्के रक्कम काढून ठेवली पाहिजेत.
यामुळे होतं काय तर अचानक काही परिस्थिती आली काही अडचणी आल्या तर तुम्ही गोंधळात पडणार नाही.
कपड्यांची खरेदी करताना एखादा सण नाही ना हे पाहून करा.
म्हणजे कमी पैशात चांगले कपडे मिळतील हे पाहिलं पाहिजेत.
हनीमूनसाठी कुठे जायचे आहे याचे योग्य प्लानिंग आखा आणि मग त्वरीत बुक करा म्हणजे पैसे कमी खर्च होतात.
लग्न म्हटलं की खर्च हा आलाच पण व्यवस्थित खर्चाचं प्लॅनिंग केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसै खर्च करावे लागणार नाही. त्याचबरोबर सांगायचं झालंच तर योग्यरित्या केलेलं नियोजन हे तुम्हाला लग्नानंतरच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे लग्नाच्या खर्चाचा ताण न घेता त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि बजेटमध्ये लग्नाचा खर्च करा.