चरबी कमी करण्यासाठी बाबा रामदेवचे उपाय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
वजन वाढणे किंवा लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की लठ्ठपणा कर्करोगापासून ते हृदयविकारापर्यंत अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे कारण आहे. वजन वाढल्याने फक्त आजार होतात असं नाही तर वजन वाढल्यानंतर आपले सौंदर्यदेखील नष्ट करते आणि याशिवाय वाढलेले वजन हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवते. पण एकदा वाढलेले वजन कमी करणे सोपे नाही. जिममध्ये तासनतास घाम गाळून, महागड्या डाएट प्लॅनचे पालन करून आणि अनेक उपाय करूनही बऱ्याच लोकांचे वजन कमी होत नाही
जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी संघर्ष करत असाल तर बाबा रामदेव तुमची मदत करू शकतात. त्यांच्या एका व्हिडिओमध्ये रामदेव यांनी काही सोप्या उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे एका महिन्यात १५ ते २० किलो वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्याचे उपाय जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
दलिया
वजन कमी करण्यासाठी दलिया
बाजरी, मूग डाळ, तांदूळ आणि थोडे तीळ आणि ओवा मिसळून तुम्ही घरी पौष्टिक दलिया बनवू शकता. वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी अत्यंत प्रभावी आहे. जुन्या काळातही याचा वापर केला जात असे अथवा तुम्ही डाळखिचडीदेखील खाऊन आपल्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता. यातून पौष्टिकता मिळत असून चरबी वाढत नाही आणि याशिवाय वजन वाढीला हे रोख लावते.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
काय सांगतात बाबा रामदेव
बाबा रामदेव म्हणाले की जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही फक्त हा दलिया खावा आणि बाकी सर्व काही खाणे थांबवावे. याशिवाय आपल्या नियमित जेवणामध्ये मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ आणि फास्ट फूड वा प्रोसेस्ड फूडचा वापर करत असाल तर ते पदार्थ खाणे तुम्ही वेळीच बंद करायला हवेत. जेणेकरून तुमच्या शरीरावरील चरबीच्या वाढीला रोख लागतो.
दुधीचा रस
दुधीचा रस पिण्याचे फायदे
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दलिया व्यतिरिक्त दुधीचा रस पिऊ शकता. दुधीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही ताजा दुधीचा रस पिण्याला प्राधान्य दिल्यास तुमचे वजन लवकर कमी होईल आणि अंगावरील चरबी वाढणार नाही. मात्र दुधीचा रस ताजा प्यावा, जास्त काळ ठेऊन दुधी रस पिण्याने शरीरात विष तयार होऊ शकते
1 महिना खाल्लीच नाही साखर वा गोड? किती होईल वजन कमी; शरीरावर कसा होईल परिणाम
अश्वगंधाची पाने
अश्वगंधाच्या पानांचा वजनासााठी उपयोग
अश्वगंधा हे आयुर्वेदिक औषध अनेक आजारांवर उपयुक्त आहे. याप्रमाणेच अश्वगंधा वजन कमी करण्यातही चांगला परिणाम दाखवते, यासाठी तुम्ही सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी अश्वगंधाची तीन पाने खावीत. अश्वगंधाची पाने खाल्ल्याने तुमचे वजन कमी होतेच आणि नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते. बाबा रामदेव म्हणाले की, जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये हा बदल केला तर तुम्ही एका महिन्यात १५ ते २० किलो वजन कमी करू शकता. याशिवाय त्यांनी सांगितले की, हा उपाय करून आम्ही पाहिले आहे की अनेक लोकांनी तीन महिन्यांत ४० ते ५० किलो वजन कमी केले आहे.