कर्णवेध संस्कार हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या संस्कारात बाळाच्या किंवा मुलाच्या कानाला छिद्र पाडून त्यात कानातले म्हणजेच स्थानिक भाषेत ज्याला कुंडी किंवा कुंडल घातले जातात. यामागे धार्मिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक अशा तिन्हीचा अर्थ दडलेला आहे. कर्णवेध म्हणजे बाळाच्या किंवा मुलाच्या कानाच्या पाळीला छिद्र पाडणे . हा संस्कार प्रामुख्याने जन्मानंतर काही महिन्यांनी किंवा काही वेळा ३–५ वर्षांच्या आत केला जातो.
धार्मिकदृष्ट्या पाहायचं झालं तर हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी एक म्हणून कर्णवेधाचा उल्लेख आढळतो. कुलदेवतेची किंवा इष्टदेवतेची कृपा लाभावी तसंच घरतल्या या तान्ह्या बाळाचं वाईट शक्तीपासून रक्षण व्हावं म्हणून कर्णवेध संस्कार केला जातो. अनेक कुटुंबात हा विधी करताना पूजा आणि हवन केलं जातं.
कानाच्या पाळीत विशिष्ट एक्युपंक्चर पॉईंट्स असतात. लहान मुलांचे अवयव कोवळे असतात म्हणूनच जर कानाच्या पाळीला छिद्र केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कानातले असल्याने कर्णाच्या भागात हवेशीरपणा राहतो व काही किरकोळ संसर्ग टाळता येतात. कर्णवेध संस्कार फक्त एक अध्यात्मिक विधी नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारणं देखील आहेत. या कर्णवेध संस्काराने बाळाच्या मेंदूचा विकास होतो. एकाग्रता वाढते तसंच बाळ लकर बोलायचं देखील शिकतं असं सर्वासाधारण सांगितलं जातं.
बाळाला दोन ते तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आणि 5 वर्षांच्या आत त्याचे कान टोचले जातात. सोन्याची बारिक तार किंवा चांदीची तार बाळाच्या कानाच्या पाळीला टोचली जाते. त्यांनंतर काही माहिन्याने बाळाला कान डुल देखील घालतात. मात्र कर्णवेध संस्कार करताना पालकांनी एक काळजी नक्की घ्यावी ती म्हणजे बाळाचे ताप, सर्दी, त्वचेचे आजार किंवा इन्फेक्शन असेल तर त्याचे कान काही दिवस टोचू नयेत. बाळाची तब्येत नाजूकअसते त्यामुळे कर्णवेध संस्कार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
Ans: कर्णवेध संस्कार म्हणजे बाळाच्या किंवा मुलाच्या कानाच्या पाळीला छिद्र पाडून त्यात कुंडी, कुंडल किंवा कानातले घालण्याची परंपरागत प्रक्रिया. हा हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक आहे.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार हा संस्कार बाळावर देवाची कृपा राहावी, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावे आणि बाळाचे आयुष्य शुभ असावे या उद्देशाने केला जातो. अनेक घरी पूजा–हवनासह हा विधी पार पाडला जातो.
Ans: बाळाला ताप, सर्दी, त्वचेचा संसर्ग किंवा इतर त्रास असल्यास कर्णवेध करणे टाळावे. बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते, म्हणून हा संस्कार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






