Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes Tips: डायबिटीसच्या रुग्णांनी रोज जांभूळ खाल्ल्याने काय होईल? खरंच मधुमेह कमी होतो, काय आहे तथ्य

डायबिटीसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोक आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. पण नियमित जांभूळ खाल्ल्यास फायदा मिळतो का?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 05, 2026 | 10:28 AM
डायबिटीस रुग्णांसाठी वरदान ठरते जांभूळ (फोटो सौजन्य - iStock)

डायबिटीस रुग्णांसाठी वरदान ठरते जांभूळ (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रोज जांभूळ खाल्ल्याने डायबिटीस कमी होतो का, काय सांगतात तज्ज्ञ
  • डायबिटीसच्या रुग्णांसाठी जांभळाचे फायदे 
  • जांभूळ खाल्ल्याने नक्की काय होते 
मधुमेह हा एक खूप सामान्य आजार आहे. आजकाल तरुण लोकांनाही त्याचा त्रास होतो. अगदी वयाच्या २० व्या वर्षापासूनही अनेकांना डायबिटीस असल्याचं लक्षात येतंय. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, मधुमेही रुग्ण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतात. जांभूळ हे असं फळ आहे जे मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याचा अनेक ठिकाणी उल्लेखही आहे. जांभळं ही डायबिटीस रूग्णांसाठी एक वरदानच आहेत. जर मधुमेही रुग्णाने दररोज योग्य प्रमाणात जांभळी फळे खाल्ली, तर त्यांना त्यांच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल जाणवू शकतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने दिलेल्या अहवालाप्रमाणे जांभळाचे डायबिटीस रुग्णांना कसे फायदे मिळतात जाणून घ्या 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

जांभळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, याचा अर्थ असा की ते खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत अचानक वाढ होत नाही. याव्यतिरिक्त, जांभळांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाची संयुगे असतात. ही संयुगे शरीरातील स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे उपाशीपोटी आणि जेवणानंतरच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते

सध्या जांभळाचा हंगाम सुरू आहे आणि दररोज जांभूळ खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे स्वादुपिंड सक्रिय होते, जे योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करते आणि पेशींना ग्लुकोज अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे अगदी डॉक्टरही रुग्णांना जांभूळ नियमित खाण्याचा सल्ला देतात. 

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

वारंवार लघवी होण्यापासून आराम

मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा जास्त तहान लागते आणि वारंवार लघवीला जावे लागते. आयुर्वेदानुसार, जांभळामधील मधुमेह-विरोधी गुणधर्म हे नियंत्रित करण्यास मदत करतात. आयुर्वेदातही जांभळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियमित अतिरेक न करता तुम्ही रोज ४-५ जांभूळ नक्कीच खाऊ शकता आणि आपल्या डायबिटीसवर नियंत्रणही ठेऊ शकता. 

हृदयाचे आरोग्य आणि वजन नियंत्रण

जांभळामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. जांभळामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला डायबिटीसच्या नियंत्रणासह वजनावरही नियंत्रण आणायचे असेल तर आपल्या फलाहारामध्ये जांभळाचा नक्की समावेश करून घ्या 

डायबिटिससाठी मोठा खुलासा! फळांचा रस पिल्याने ब्लड शुगर वाढते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

सेवनाची योग्य पद्धत आणि प्रमाण

मधुमेहाचे रुग्ण दिवसाला ८० ते १०० ग्रॅम जांभूळ खाऊ शकतात. बिया खाल्ल्यानंतर त्या फेकून देऊ नका कारण तुम्ही या बियांचाही डायबिटीससाठी उपयोग करून घेऊ शकता. या जांभळाच्या बिया वाळवून त्याची पावडर बनवा आणि सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सेवन करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. याचे सेवन करण्यापूर्वी आपल्या नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What happen if diabetic patient eats jamun aka blackberry everyday expert revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Tips
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
1

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
2

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
3

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
4

शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.