(फोटो सौजन्य: istock)
बीडीआर फार्मास्युटिकल्सचे तांत्रिक संचालक डॉ. अरविंद बडीगर यांच्या मते, आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आहारात फळांच्या रसाचे सेवन एक चांगला पर्याय आहे. तथापि, रक्तातील साखरेच्या नियंत्रणावरील त्याचा परिणाम चिंतेचा विषय ठरू शकतो. फळांचा रस पिणे हानिकारक नसले तरी त्याच्या सेवनाच्या प्रमाणावर आणि वेळेवर ते अवलंबून असते. संशोधनातून असे समोर आले आहे की, फळांच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स हा मध्यम ते किंचित जास्त असतो. याचा अर्थ तो लवकर पचला जातो आणि सेवन केल्यानंतर काही वेळासाठी तो रक्तातील साखर वाढवू शकतो. हे सामान्य आहे की रसाच्या स्वरुपात तुम्ही काही प्रमाणात साखरेचे सेवन करत असता.
सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की, फळांचा रस पिणे आणि त्या फळाला थेट खाणे यात मोठा फरक असतो. संपूर्ण फळात फायबरचे प्रमाण अधिक असते जे शरीरातील साखरेचे शोषण मंदावते. तथापि, जेव्हा फळांचा रस तयार केला जातो तेव्हा त्यातील अधिकतर फायबर हे काढून टाकले जाते आणि फक्त साखरेचा द्रव शिल्लक राहतो. त्यामुळे फळाने नाही पण त्याच्या रसाने नक्कीच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
फळांचा रस हानिकारक असतो का?
याचा पूर्णपणे अर्थ असा नाही की फळांचा रस आरोग्यासाठी हानिकारक असतोच. अनेक अभ्यास आणि मेटा-विश्लेषणांमधून असे दिसून आले आहे की, जर फळांचा रस हा प्रमाणात पिला तर त्याचा मधुमेहावर थेट परिणाम होत नाही. मूळ समस्या ही रसात नाही तर त्याच्या प्रमाणात आहे.
त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत
फळांच्या रसात साखर कशी काम करते?
फळांच्या रसातील नैसर्गिक शर्करा दोन प्रकारच्या असतात, यातील एकाला फ्रुक्टोज तर दुसऱ्याला ग्लुकोज असे म्हटले जाते. हे प्रक्रिया केलेल्या ड्रिंक्सहून वेगळे असते कारण ते थेट फळांमधून मिळत असते. हे लक्षात घ्या की, फळांचा रस पिण्याच्या पद्धतीत लक्षणीय फरक आहे. रस काढल्याने फळांमधील बहुतेक फायबर निघून जाते. पण शरीराला फायबर अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते शरीरातील साखरेचे शोषण मंदावते. फायबरशिवाय, रसातील शर्करा अधिक वेगाने शोषली जाते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






