नव्या पिढीला भावतोय नात्यातील ट्रेंड (फोटो सौजन्य - iStock)
आजकाल नात्यांमध्ये अनेक ट्रेंड आहेत. नॅनो शिप, सिच्युएशनशिप, स्लो फॅशन इत्यादी नावं आपल्या कानावर येत असतात. सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. ‘Date Them Till You Hate Them’ असे या ट्रेंडचे नाव आहे. अर्थात या नावातून त्यातील गर्भितार्थ नक्कीच कळतोय. पण तरूणांना हा ट्रेंड का आवडतोय ते जाणून घेऊया.
या ट्रेंडचे नावच असे सुचवते की तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या छोट्या छोट्या सवयींमुळे नाराज होईपर्यंत किंवा कंटाळा येईपर्यंत आणि सहजपणे ब्रेकअप करण्याचा निर्णय घेईपर्यंत तुम्ही त्याच्याशी नातेसंबंधात राहावे. यामुळे तुम्ही सतत त्याच्या आठवणीत रमणार नाही असा यामागील अर्थ त्याच्या नावातून नक्कीच समोर येतोय. याबाबत अधिक माहिती समुपदेशक अजित भिडे यांनी दिली आहे.
काय आहे हा नवा ट्रेंड?
आजच्या काळात, हा नवा ट्रेंड अनेक लोकांमध्ये दिसून येत आहे. नातेसंबंधांच्या या ट्रेंडमध्ये, Couple एकमेकांना कंटाळेपर्यंत डेट करतात. अशा परिस्थितीत, ब्रेकअप करणे अधिक सोपे आहे. तसंच ब्रेकअपनंतर होणारा त्रास कमी होतो. या ट्रेंडमध्ये, नात्यात असणाऱ्या दोन्ही व्यक्ती त्यांच्या समस्या आणि अडचणींबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना वाढू देतात. जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत अजिबात एकमेकांशी बोलत नाहीत, ज्यामुळे नात्यातील अपेक्षांचं ओझं येत नाही असं अनेकांना वाटतं. काही लोक हा ट्रेंड स्वीकारत आहेत आणि त्याचे समर्थनदेखील करताना दिसत आहेत.
Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय
या ट्रेंडचे फायदे
या ट्रेंडमागील सर्वात मोठा फायदा म्हणजे भावनिक सुरक्षितता. ब्रेकअपचे दुःख पचवणे खूप कठीण असते. ‘Date Them Till You Hate Them’ हे एक प्रकारचे भावनिक नियोजन आहे. यामध्ये नकारात्मकता जाणूनबुजून वाढवली जाते जेणेकरून एखादी व्यक्ती ब्रेकअपसाठी स्वतःला तयार करू शकेल. बरेचदा भावनिकतेमुळे माणूस गुंतून पडतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्याचा राग करू लागता, तेव्हा ब्रेकअप अगदी सहजपणे करणं सोपं होतं.
कारण तोपर्यंत तुम्ही पूर्ण तुटून गेलेले असता आणि मनावर समोरच्या माणसाच्या वागण्याचा परिणाम होणं बंद होतं. जेव्हा ब्रेकअपचा दिवस येतो तेव्हा व्यक्ती त्याच्या जोडीदारापासून भावनिकदृष्ट्या सहजपणे तुटते आणि म्हणूनच त्या व्यक्तीला जास्त वेदना होत नाहीत आणि या नात्यातून सहजपणे बाहेर पडता येतं. वेगळं झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणीने अधिक त्रास करून घेतला जात नाही.
Bhagyashree ने नातं निभावण्यासाठी सांगितली सोपी गोष्ट, मजबूत नात्यासाठी काय करावे
सोशल मीडियावर चर्चा
या ट्रेंडबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही लोक या ट्रेंडच्या समर्थनात आहेत, तर काहींना हा ट्रेंड आवडत नाही. काही लोक म्हणतात की हा खूप स्वार्थी आणि भावनिकदृष्ट्या वाईट असा ट्रेंड आहे, तो संवादाचा अभाव आणि नात्यात अपरिपक्वता दर्शवितो. तसंच यातून काहीच सिद्ध होत नाही आणि असं केल्याने ब्रेकअपचा त्रास होणारच नाही असंही नाही. हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार असते. कोणतंही नातं अशा पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याचा त्रास होत नाही याचीही हमी देता येत नाही.