प्रेम कसे टिकवावे (फोटो सौजन्य - iStock)
जगाचाही विचार न करता अनेक जोड्या असतात ज्या आपण आजूबाजूला पाहतो आणि त्यांना एकत्र राहायचं असतं म्हणून पळून जाऊन लग्न करतात अथवा जगाला न जुमानता एकत्र राहतात. पण हल्ली अशाही जोड्या अधिक दिसत आहेत, ज्यांच्याकडे बघून प्रेमाचा आदर्श घेत असता असता अचानक त्यांनी वेगळं होण्याच्या चर्चा समोर येतात. मग प्रश्न पडतो की अरे इतक्या वर्षांनंतर नातं का टिकत नाही? असं काय घडतंय की नात्यातील गणितच पूर्ण बिघडतंय
खरं तर राग, अहंकार, एकमेकांना वेळ न देणं, एकमेकांना समजून न घेणं, बोलणं ऐकून समजून घेण्याऐवजी केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकणं हे सर्व प्रमाण वाढलं आहे. एकमेकांना साथ देण्याऐवजी जगात अनेक पर्याय आहेत हा दृष्टीकोन वाढलाय. प्रेम जपून ठेवण्यापेक्षा आपल्या रागाला आणि अहंकाराला कुरवाळत बसणं अधिक वाढताना दिसतंय. हीच माणसं पुन्हा प्रेमात पडून वेगळ्या व्यक्तीबरोबर राहतात पण त्याच व्यक्तीच्या परत प्रेमात का नाही पडत? तुम्हाला पण हा प्रश्न पडतोय का?
पुन्हा प्रेमात पडण्याची गरज
प्रेम टिकविण्यासाठी पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडायला हवे
आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात काही वर्षापूर्वी पडलो होतो त्याच व्यक्तीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडायची गरज असते हेच माणसं विसरतात. कामं, समाज आणि इतर कर्तव्याच्या दबावाखाली अथवा त्या नावाखाली आपण आपल्याच प्रेमाला दुखावत आहोत आणि स्वतःच्या मनालाही याचाच विसर पडला जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला मिळविण्यासाठीच धडपडतेय, भांडतेय हेच कळणं एका स्तरावर येऊन बंद होतं.
आपण करतो तेच बरोबर आहे असं वाटतं आणि मग इथेच सर्व चुकत जातं. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय, वेगळं होण्यापूर्वी पुन्हा एकदा पहिले दिवस जगण्याचा प्रयत्न करून पहा, कदाचित तुमचं नातं वाचू शकतं.
समजून घ्या
कितीही भांडणं होत असतील पण प्रेम तर अजून शिल्लक आहे ना? हे आधी समजून घ्या. समोरची व्यक्ती इतर कोणत्या गोष्टीसाठी भांडत आहे की आपण एकत्र राहवं यासाठी भांडत आहे याचा आधी नीट विचार करा आणि तुम्हाला जाणवलं की त्या व्यक्तीला तुमचं प्रेम, काळजी, वेळ आणि आपुलकीव्यतिरिक्त काहीच नकोय तर तुम्ही त्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला आयुष्यातून गमावू शकताय हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्यावर अजूनही प्रेम करत असलेल्या व्यक्तींचं म्हणणंं आधी समजून घ्या
ChatGPT तुमचं नातं वाचवू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं AI Therapy Trend नात्यासाठी योग्य आहे की नाही
सोडून जाणं शेवटचा पर्याय
समोरची व्यक्ती कधीच स्वतःच्या मनाने ‘मी सोडून जात आहे’ म्हणणार नाही. त्या व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत होईल तेव्हाच हे पाऊल उचलणार हे तुम्हाला माहीत असायला हवं आणि तुम्ही सतत एखाद्याला गृहीत धरत असाल तर तरच सोडून जाणं हा शेवटचा पर्याय त्या व्यक्तीकडे असतो हे तुम्हाला कळायला हवं. त्यामुळे अशी व्यक्ती सोडून जात असेल तर वेळीच तुम्ही सावरा आणि पुन्हा आपलं नातं पहिल्या वळणावर घेऊन यायची गरज आहे समजून घ्या
संवादाची गरज
एकमेकांशी बोलायला हवे
कोणतंही नातं हे संवादावर टिकतं. पण सतत वाद होत असतील तर संवाद दोन्ही बाजूने होतो हे समजून घ्या. एक बोलत आहे व्यक्त होत आणि दुसरी व्यक्ती काहीच व्यक्त होत नसेल तर नात्यातील संवाद पूर्णतः मरतो आणि त्यामुळे नातंही मरतं. तुम्हाला नातं टिकविण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील व्यक्ती जपण्यासाठी बोलणंदेखील गरजेचे आहे.
स्पर्श महत्त्वाचा
प्रेमासह स्पर्श गरजेचा आहे
कितीतरी महिने तुम्हाला एकमेकांचा स्पर्श होत नसेल तर ते नात्यातील मोठे आणि चुकीचे पाऊल ठरू शकते. किमान एकमेकांचा हात हातात घेऊन बसणे, दिवसातून एकदा तरी जवळ घेणे, गालावर Kiss घेणे आठवड्यातून किमान दोन वेळ एकत्र गप्पा मारत समजून घेत स्पर्शाची आणि आपण एकमेकांसाठी आहोत ही जाणीव करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कितीही वर्ष झाली असली तरीही स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने व्यक्त होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. स्पर्श असेल तर कितीही मोठं भांडण असेल त्वरीत संपून जाण्यास मदत मिळते.
ब्रेकअपपूर्वी नातं टिकविण्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे का? व्यक्त होऊन सुटतील प्रश्न