डेड बट सिंड्रोम म्हणजे काय
आजकाल निष्क्रिय जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांनी अनेक आजारांना अगदी स्वतःहून आमंत्रण दिले आहे. विशेषतः डेस्क जॉब करणाऱ्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. इच्छा नसतानाही त्यांना तासनतास एकाच खुर्चीत बसणं भाग आहे आणि त्यामुळे सर्वाधिक शारीरिक समस्या निर्माण होतात. हे माहीत असूनही सतत कामासाठी बसावंच लागतं.
यापैकी एक समस्या ही अत्यंत गंभीर स्थिती सध्या होताना दिसतेय आणि ती म्हणझे डेड बट सिंड्रोम. जर तुम्ही दिवसभरात एकाच ठिकाणी 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून वेळ घालवत असाल तर तुमच्यासाठी डेड बट सिंड्रोम बद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही हा शब्द जर पहिल्यांदाच वाचला असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती या लेखातून आम्ही देत आहोत (फोटो सौजन्य – iStock)
काय आहे डेड बट सिंड्रोम?

डेड बट सिंड्रोम कशामुळे होते आणि काय आहेत लक्षणे
बराच वेळ बसून राहिल्याने मांडीचे स्नायू सक्रियपणे काम करत नाहीत तेव्हा डेड बट सिंड्रोम होतो. जेव्हा नितंबांमधील स्नायू योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि प्रत्यक्षात झोपायला जातात तेव्हा असे होते. बराच वेळ बसल्यामुळे हे स्नायू निष्क्रिय मोडमध्ये जातात. अशा परिस्थितीत, शरीर ते सक्रिय करण्यास विसरते. म्हणूनच डेड बट सिंड्रोमला ग्लूटील ॲम्नेशिया असेदेखील म्हणतात.
हिपचे स्नायू हे शरीरातील सर्वात मोठे स्नायू आहेत. आपल्या शरीराच्या बहुतेक हालचालींमध्ये हे महत्त्वाची भूमिका बजावते. बराच वेळ बसून राहिल्याने काम होत नाही, तेव्हा त्यांच्या कामाचा भार शरीराच्या इतर भागांवर पडतो जसे गुडघे, पाठ इ. त्यामुळे या अवयवांच्या स्नायूंवर अनावश्यक दबाव पडतो.
हेदेखील वाचा – वयाच्या २० मध्ये हाडांमधील कॅल्शियम कमी झालं आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
काय आहे लक्षणे

रोज व्यायाम करणे आहे आवश्यक
एनसीबीआयनुसार, डेड बट सिंड्रोमच्या समस्येमुळे कंबर, मान, नितंब आणि घोट्यात वेदना होतात. अशा परिस्थितीत या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी रोज व्यायाम करायला हवा. जंप स्क्वॅट्स, बँड्ससह साइड स्टेप्स आणि साइड लंगजमधून तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. आपल्या ट्रेनरच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही व्यायाम करणे आवश्यक आहे.
अर्ध्या तासाने उठा
घर असो किंवा ऑफिस, सतत एकाच ठिकाणी बसणे टाळा. तुम्ही मधेच छोटे छोटे ब्रेक घेत रहा. शक्य असल्यास, आपण स्ट्रेचिंग करणे किंवा अगदी सहज 5 मिनिट्स चालणे याचा अवलबं करू शकता. आपण इच्छित असल्यास, दर अर्ध्या तासाने किमान 5 मिनिटे ब्रेक घेऊ शकता. अगदी ऑफिसच्या पॅसेजमध्येही तुम्ही एक फेरी मारून येणे उत्तम ठरू शकते
हेदेखील वाचा – हाडांच्या टेस्टवरून वय कसे ओळखता येते? Baba Siddique मर्डर केसमध्ये झाला वापर
योग्य पद्धतीने बसा

ऑफिसमध्ये वा घरात योग्य पद्धतीने बसा
ऑफिसमध्ये बरेचदा चुकीच्या पद्धतीने बसल्यानेदेखील डेड बट सिंड्रोम होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण नेहमी बरोबर बसतो याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वाकून बसू नका आणि आपले गुडघे नेहमी 90 अंशाच्या कोनात ठेवा. याशिवाय बसताना पाठीचा आधारही आवश्यक असतो. शक्य असल्यास घरातील उशी तुम्ही न्या आणि पाठिशी ठेवा, ज्यामुळे पाठिला आधार मिळतो
एखाद्या खेळात सक्रिय व्हा

तुमच्या आवडत्या खेळामध्ये सहभागी व्हा
तुमचे ओटीपोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत आणि सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही खेळांमध्ये भाग घेतला पाहिजे. याशिवाय पोहणे आणि नृत्य करणे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट अथवा एखादा मैदानी खेळ जो तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून तुमच्या शरीराचा योग्य व्यायाम होईल
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






