हेमेटोक्रिट टेस्ट म्हणजे काय
रक्तातील रेड ब्लड सेल्सचे (RBC) प्रमाण मोजण्यासाठी हीमेटोक्रिट चाचणी एक महत्त्वपूर्ण चाचणी आहे. ही कंप्लीट ब्लड काऊंट (CBC) चा एक महत्वपूर्ण भाग असून त्यामुळे तुमच्या आरोग्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते. विविध रोगांचे लवकर निदान आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने हेमेटोक्रिट चाचणी का आणि कधी करावी हे समजून घेणे गरजेचे आहे.
डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तसंच ही चाचणी का करावी आणि याचे महत्त्वही त्यांनी या लेखातून सांगितले आहे, जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
हिमेटोक्रिट चाचणी का करावी?

चाचणी करणे का आवश्यक आहे
अॅनिमिया आणि पॉलिसिथेमियाचे निदानः
अॅनिमिया: हेमेटोक्रिट पातळी कमी असल्यास अॅनिमिया होऊ शकतो, असा आजार ज्यामध्ये रक्तामधील लाल रक्तपेशी कमी होतात, अॅनिमियामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. लवकर लक्षात आल्यास लक्षणे ओळखून पौष्टिक कमतरता किंवा गंभीर आजार यासारख्या मूळ कारणांवर उपाय करणे शक्य होते.
पॉलीसिथेमियाः याउलट, हेमेटोक्रिटची पातळी जास्त असल्यास पॉलीसिथेमिया असण्याची शक्यता असते, असा विकार ज्यामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गंभीर धोका टाळण्यासाठी पॉलिसिथेमियाचे निदान लवकर होणे महत्वाचे आहे.
हेदेखील वाचा – अशी लक्षणे दिसत असतील तर समजा किडनी झालीये कमकुवत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!
जुनाट आजारांवर देखरेख
किडनीचे आजार, हृदयरोग किंवा फुफ्फुसांचे रोग असलेल्या रूग्णांना बऱ्याचदा नियमित हेमॅटोक्रिट चाचण्या करणे आवश्यक असते. या आजारामुळे आरबीसीचे उत्पादन आणि ऑक्सिजनच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून हेमॅटोक्रिट पातळी रोगाचे प्रमाण आणि उपचारांच्या कार्यक्षमतेचे प्रमुख सूचक बनते.
हायड्रेशन पातळीचे मूल्यांकन
हेमेटोक्रिटची पातळी हायड्रेशनच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यास मदत करू शकते. हेमॅटोक्रिट कमी म्हणजे ओव्हरहायड्रेशन तर उच्च पातळी म्हणजे डिहायड्रेशन असू शकते. हायड्रेशनचे प्रमाण योग्य असल्यास शरीर व्यवस्थित काम करू शकते, हायड्रेशनच्या असंतुलनाचा एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
बोन मॅरो फंक्शनचे मूल्यांकन
आरबीसीच्या निर्मितीसाठी बोन मॅरो जबाबदार असल्याने, हेमॅटोक्रिट चाचणी त्याच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास मदत करू शकते. असामान्य हेमॅटोक्रिट पातळी अस्थिमज्जा विकार किंवा आरबीसी उत्पादनावर परिणाम करणार्या इतर समस्यांचे संकेत देऊ शकते.
हेमॅटोक्रिट चाचणी कधी करावी?

हेमेटोक्रिट चाचणी का करावी
नियमित तपासणीमध्ये बऱ्याचदा सीबीसीचा समावेश असतो, ज्यामध्ये हेमॅटोक्रिट चाचणीचा समावेश असतो. यामुळे लक्षणे नसतानाही आरोग्याच्या संभाव्य समस्या लवकर लक्षात येण्यास मदत मिळते.
हेदेखील वाचा – दुपारी झोप टाळण्यासाठी पिताय चहा? शरीराला कसे ठरते नुकसानदायी
अॅनिमिया किंवा पॉलिसिथेमियाची लक्षणे
गंभीर आजारांचे व्यवस्थापन
मूत्रपिंड रोग, हृदय बंद पडणे किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखे गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार उपचारात बदल करण्यासाठी हेमॅटोक्रिट चाचण्या नियमितपणे केल्या पाहिजेत.
प्री – आणि पोस्ट – सर्जिकल मूल्यांकन
अॅनिमिया किंवा रक्त मोठ्या प्रमाणात कमी होणे होण्याचा धोका नाही याची खात्री करण्यासाठी बऱ्याचदा शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर हेमॅटोक्रिट चाचण्या केल्या जातात.
हायड्रेशन आणि एकूण आरोग्यावर लक्ष ठेवणे
अॅथलीट्स, उंच भागात राहणारे लोक आणि आहार किंवा हायड्रेशनच्या स्थितीत लक्षणीय बदल झालेल्यांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि हायड्रेशन आणि आरबीसी पातळीशी संबंधित अडचणी टाळण्यासाठी नियमितपणे केलेल्या हेमॅटोक्रिट चाचण्यांचा फायदा होऊ शकतो.
हेमॅटोक्रिट चाचणी हे एक साधे परंतु प्रभावी साधन आहे जे आपल्या आरोग्याबद्दल आवश्यक माहिती देते. नियमित चाचणीमुळे वेळेवर निदान होऊन काही आजार असल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात पर्यायाने आरोग्य चांगले राहण्यात मदत मिळते. तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार हेमॅटोक्रिट चाचण्यांची योग्य वारंवारता आणि वेळ निश्चित करण्यासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






