मावळच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राष्ट्रवादीसोबत कोणतीही युती होणार नसल्याचं स्पष्ट करत महायुतीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली.भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय एकत्र मैदानात उतरल्याने मावळमध्ये महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगणार आहे. घराणेशाही, कार्यकर्त्यांची गळचेपी आणि आश्वासनांवर निर्णय न झाल्याचा आरोप करत प्रशांत भागवत यांनी हा निर्णय कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी घेतल्याचं सांगितलं आहे. निवडणुकीपूर्वीच मावळच्या राजकारणात ही लढाई आता अस्तित्वाची ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.