दारूचे पेग ३० मिली, ६० मिली आणि ९० मिली'चेच का असतात; काय आहे यामागचं कारण?
Liquor pegs: दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी, जगभरात दारूप्रेमींची कमतरता नाही. जगभरात शेकडो प्रकारची मद्ये आज पाहायला मिळतात. अनेकदा तुम्ही दारूप्रेमींना पेग बनवण्याबद्दल बोलताना ऐकले असेल. एक छोटा पेग ३० मिली चा असतो, मध्यम आकाराचा पेग ६० मिली चा असतो आणि मोठा पेग ९० मिली’चा असतो, ज्याला ‘पटियाला पेग’ असेही म्हणतात. दारूचे पेग फक्त ३०, ६० मिली चेच का असतात, यापेक्षा जास्त किंवा कमी का नसतात. असेही प्रश्न आज उपस्थित होत आहेत.
अनेकदा दारूच्या बाटल्या ७५० मिलीच्या असतात, म्हणून ३० आणि ६० मिली पेग दारूचा हिशोब ठेवण्यासाठी सोयीस्कर असतात. बारटेंडरला दारू सर्व्ह करणे देखील सोयीचे असते कारण त्याला बाटलीतून किती दारू वापरली गेली आहे हे कळते. लहान पेग म्हणजे ३० मिली, मध्यम पेग म्हणजे ६० मिली. याशिवाय ९० मिलीचा पेग असेही म्हणतात. लोक त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार पेग घेतात. ज्यांना सौम्य नशा हवी असते ते ३० मिली पेग घेतात, ३० मिली हे एक आदर्श प्रमाण मानले जाते.
३० मिलीचा पेग लोक हळूहळू पिऊ शकतात आणि तो पचवण्यासही सोपा असतो. कमी प्रमाणात मद्यपान केल्याने यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहतात असेही म्हटले जाते. तसेच कमी प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास त्याने शरीराला जास्त नुकसान होत नाही. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना एका वेळी ६० किंवा ९० मिली मोठा पेग पिण्याचे धाडस करतात.
पेग हा शब्द कुठून आला याबद्दल अचूक माहिती नाही. परंतु युनायटेड किंग्डममध्ये खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संध्याकाळी दारू दिली जात असे, त्याला ‘प्रेशियस इव्हनिंग ग्लास’ म्हणजेच संध्याकाळी दिलेला ग्लास असे म्हणतात. ‘पेग’ हा शब्द येथूनच आला, असे मानले जाते. पेग हा शब्द ब्रिटिशांसोबत भारतात पोहोचला. हळूहळू तो भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला. भारतात ते ३० मिली आणि ६० मिली मध्ये मोजले जाते परंतु काही मद्यप्रेमी ९० मिली पर्यंत वापरतात. भारत आणि नेपाळ हे जगातील एकमेव देश आहेत जिथे अल्कोहोलचे एकक पेगच्या स्वरूपात मोजले जाते.