फोटो सौजन्य: Freepik
हल्ली तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. त्यामागे जीवनशैलीतील बदल, आहारातील कमतरता, ताणतणाव, प्रदूषण, हे कारण असतात. परंतु योग्य उपाययोजना करून आपण या समस्येला काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो.
डॉक्टरांच्या मते, केस लवकर पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी थायरॉईड रोग आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ही सामान्य कारणे आहेत. मात्र, मानसिक ताणतणाव हे देखील यामागे कारण असू शकते. काही संशोधनात असेही समोर आले आहे की फोन रेडिएशनमुळे देखील केस पांढरे होऊ शकतात, पण याची पूर्णपणे पुष्टी झालेली नाही. जरी पांढऱ्या केसांना थांबवण्यासाठी बाजारात प्रभावशाली उपचार उपलब्ध नसला तरी पुढील मार्गांचा अवलंब करू शकता.
हे देखील वाचा: केस धुतल्यानंतर सुद्धा केसांना वास येतो? मग नियमित करा ‘या’ घरगुती पदार्थांचा वापर
जर तुम्हाला पांढरे केस कमी करायचे आहे तर काही आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणेज तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करावे. रोज ७ ते ८ तास चांगली झोप घ्यावी, रोजच्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवावे, आठवड्यातून एकदा उपवास ठेवावा, थायरॉईड किंवा इतर आजार आढळल्यास त्यावर उपचार करा.
तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हॉर्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे पांढऱ्या केसांचे प्रमाण वाढते. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगासने, आणि नियमित व्यायामाचा अवलंब करा. तणाव मुक्त राहिल्यास आपल्या केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
केसांच्या काळजीसाठी केमिकल उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर ठरतात. आवळा, कोरफड, हिना, मेथीचे दाणे, नारळ तेल यांचा वापर केसांच्या काळजीसाठी करा. उदाहरणार्थ, नारळाच्या तेलात आवळ्याचा रस मिसळून केसांना लावल्यास पांढऱ्या केसांची संख्या कमी होऊ शकते.
केसांना शॅम्पू आणि कंडिशनरने नियमितपणे स्वच्छ करा. त्यासाठी नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा. केसांना तळपत्या उन्हापासून, प्रदूषणापासून वाचवा. केसांच्या आरोग्यासाठी त्याची नियमित मालिश करणे खूप महत्त्वाचे आहे.