Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरा थर दिसू लागतो. अशावेळी योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2026 | 10:16 AM
हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! 'या' साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! 'या' साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्य त्वचा आणि केसांचे सुद्धा आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या दिवसांमध्ये शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, केस कोरडे होणे, चेहऱ्यावर पिंपल्स, ऍक्ने येणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. थंड वातावरणामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा पूर्णपणे नष्ट होऊन जातो. त्वचेमधील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर त्वचा खरखरीत आणि रखरखीत होऊन जाते. अशावेळी महिला वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर आणि महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे कालांतराने त्वचा ताणल्यासारखी वाटते. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतील. आज आम्ही तुम्हाला त्वचा कायमच टवटवीत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय

थंडीच्या दिवसांमध्ये या सवयी फॉलो करून घ्या त्वचेची काळजी:

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. अशावेळी नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनासोबतच ताक, दही, विटामिन सी युक्त पेयांचे सेवन केल्यास त्वचा कायमच हायड्रेट आणि ओलसर राहते. फॅट्स, जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स आणि पाणी इत्यादी घटक त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, विटामिन ए, सी आणि ई, बदाम, अक्रोड, तीळ, जवस, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि आवळा इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

आपल्यातील अनेकांना कायमच चेहरा स्वच्छ करताना साबण लावण्याची सवय असते. पण केमिकल युक्त साबण त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब करून टाकतो. यामुळे त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर त्या कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण लहान मोठ्या चुका त्वचेची पीएच पातळी खराब करून टाकतात.अंघोळ केल्यानंतर त्वचा हलकीशी ओली ठेवावी. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर, बॉडी लोशन किंवा खोबरेल तेल लावल्यास त्वचेवरील कोरडेपणा कमी होईल.

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

थंडीच्या दिवसांमध्ये खूप कमी तहान लागते. पाणी पिण्याची जास्त इच्छा होत नाही. अशावेळी पुरेसे पाणी, कोमट पाणी, सूप, हर्बल चहा घेतल्यास त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया त्वचा आतून खराब होण्याचे महत्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाणी, आवळ्याचा रस, डिटॉक्स ड्रिंक प्यावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Your skin will stay fresh and radiant throughout the winter these simple habits will make your skin beautiful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम
1

चेहऱ्यावरील पिंपल्स कायमचे होतील गायब! रोजच्या आहारात करा ड्रॅगन फ्रूटचा समावेश, शरीरावर दिसून येतील जादुई परिणाम

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस
2

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय
3

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गभींर आजारांची लागण, शांत व गाढ झोपेसाठी करून पाहा घरगुती उपाय

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो
4

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.