पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या लढतीत कॉमेट्स संघाने रेव्हन्स संघाचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून अनिकेत शिंदे, बिपीन देव, आदिती रोडे, सोहम जोशी, दिप्ती सरदेसाई, प्रीती सप्रे, गौतम लोणकर, यश मेहेंदळे यांनी सुरेख कामगिरी केली.
फाल्कन्स संघाची अंतिम फेरीत धडक
उपांत्य फेरीत दुसऱ्या सामन्यात फाल्कन्स संघाने ईगल्स संघाचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. फाल्कन्स संघाकडून सारंग आठवले, सुधांशु मेडसीकर, चैत्रा आपटे, वैजयंती मराठे, जितेंद्र केळकर, प्रशांत वैद्य, सोहम कांगो, रिआन करंदीकर यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल : उपांत्य फेरी :
कॉमेट्स वि.वि.रेव्हन्स 4-2(गोल्ड खुला दुहेरी 1: अनिकेत शिंदे/बिपीन देव वि.वि.तन्मय चोभे/विमल हंसराज 21-19, 17-21, 15-09; खुला दुहेरी 3: आदिती रोडे/सोहम जोशी वि.वि.निनाद देशमुख/चिन्मय चिरपुटकर 21-18, 21-08; महिला दुहेरी 4: दिप्ती सरदेसाई/प्रीती सप्रे वि.वि.संस्कृती जोशी/सुचित्रा जोशी 21-14, 21-10; वाईजमन दुहेरी 5: श्रीदत्त शानबाग/निलेश केळकर पराभुत वि. अजय पटवर्धन/देवेंद्र राठी 09-21, 21-20,04-15; खुला दुहेरी 6: देवरत शहाणे/आदित्य भट पराभुत वि. हरीश अय्यर/स्वरूप कुलकर्णी 00-15, 00-15; खुला दुहेरी 7: गौतम लोणकर/यश मेहेंदळे वि.वि.विष्णू गोखले/नितल शहा 15-14, 15-12)
फाल्कन्स वि. ईगल्स
फाल्कन्स वि.वि.ईगल्स 4-2(गोल्ड खुला दुहेरी 1: सारंग आठवले/सुधांशु मेडसीकर वि.वि.आर्य देवधर/अमित देवधर 20-21, 21-18, 15-12; खुला दुहेरी 3: अभिजीत राजवाडे/विनीत रुकारी पराभुत वि.अक्षय ओक/यश काळे 18-21, 21-14, 09-15; महिला दुहेरी 4: चैत्रा आपटे/वैजयंती मराठे वि.वि.जान्हवी कोरे/दिया मुथा 21-14, 21-09; वाईजमन दुहेरी 5: जितेंद्र केळकर/प्रशांत वैद्य वि.वि.अनिल देडगे/सचिन जोशी 21-13, 21-15; खुला दुहेरी 6: अमर श्रॉफ/चैतन्य वाळिंबे पराभुत वि. अनिश रुईकर/रोहित भालेराव 15-13, 11-15, 11-15; खुला दुहेरी 7: सोहम कांगो/रिआन करंदीकर वि.वि.विनीत राठी/वरद चितळे 15-09, 15-14);