
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
01 Aug 2026 11:03 AM (IST)
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंबा घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आंबा घाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील भाग आहे. सततच्या पावसामुळे कि.मी. ६९.५०० ते ६९.६०० दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी १०० मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता NHAI च्या अहवालात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
01 Aug 2026 10:53 AM (IST)
श्रीलंकेची भूमी भारतीय कसोटी संघासाठी नेहमीच तिच्या अनोख्या आव्हानांसाठी ओळखली जाते. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भारतीय संघ पुन्हा एकदा श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळत आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणारी ही दोन कसोटी सामन्यांची द्विपक्षीय मालिका, भारतासाठी केवळ एक सामना नसून, तरुण खेळाडूंच्या नव्या पिढीसाठी एक कठीण परीक्षा आहे. भारत श्रीलंकेत द्विपक्षीय कसोटी मालिका खेळण्याची ही नववी वेळ आहे.
01 Aug 2026 10:43 AM (IST)
12 ऑगस्ट रोजी टेक कंपनी गूगलच्या मेड बाय गूगल ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी पिक्सेल 11 सिरीज लाँच करणार आहे. ज्यामध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड यांचा समावेश असणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये कंपनी नवीन स्मार्टवॉच देखील लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. पण आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी आणि ईव्हेंट सुरु होण्यापूर्वीच करंट-जनरेशन पिक्सेल 10 स्वस्त झाला आहे.
01 Aug 2026 10:33 AM (IST)
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची शक्यता असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंबा घाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
01 Aug 2026 10:23 AM (IST)
महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे डिसेंबर २०२६ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, जर ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत निवडणुका झाल्या, तर अनेक जिल्ह्यांमधील आरक्षणाचे संपूर्ण समीकरण बदलू शकते.
01 Aug 2026 10:13 AM (IST)
दिल्लीतील जंतरमंतर मैदानातील झेन-झी आंदोलनात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणाबाजी करण्यात आल्या. संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणही करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर विद्यार्थ्यांच्या दबावापुढे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घटनेनंतर शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी जंतर मंतर आंदोलनादरम्यान वापरलेल्या अपमानास्पद भाषेबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
01 Aug 2026 09:20 AM (IST)
PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इन्स्टाग्रामवर (Instagram Live) थेट येत देशातील तरुण पिढीशी ('जेन-झी' / Gen-Z) संवाद साधला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवर भाष्य करत, "मी त्या तरुणांना माफ करतो," असे उद्गार त्यांनी काढले.
यासोबतच राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत देशाच्या विकासासाठी काम करण्याचे एक भावनिक आवाहन त्यांनी देशातील युवा वर्गाला केले. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून जोरदार चर्चेत आला आहे.
01 Aug 2026 09:15 AM (IST)
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील आठ प्रमुख तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे खालील तालुक्यांमधील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१. मालेगाव
२. नांदगाव
३. बागलाण (सटाणा)
४. कळवण
५. त्र्यंबकेश्वर
६. इगतपुरी
७. पेठ
८. सुरगाणा
01 Aug 2026 09:09 AM (IST)
Karachi Crime: पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरातील कुख्यात लियारी (Lyari) परिसरात गुरुवारी सायंकाळी एक भीषण गोळीबाराची घटना घडली. तुरुंगात असलेला कुख्यात गँगस्टर आणि 'पीपल्स अमन कमिटी'चा माजी प्रमुख उझैर बलोच (Uzair Baloch) याच्या भावावर, झुबैर बलोच याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात झुबैर बलोच गंभीर जखमी झाला असून, जवळच उपस्थित असलेले इतर दोन नागरिकही गोळ्या लागून जखमी झाले आहेत.
01 Aug 2026 09:00 AM (IST)
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर २०० रुपयांपेक्षा जास्त किमतीने कमी झाला आहे. वाचा सविस्तर
01 Aug 2026 08:52 AM (IST)
मुंबई : राज्यातील मालमत्तेचे व्यवहार अधिक पारदर्शक आणि विवादमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच भू-हक्क कायदा लागू करणार आहे. गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात ही घोषणा करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, प्रस्तावित कायद्यावर अंतिम निर्णय डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाईल. वाचा सविस्तर-
01 Aug 2026 08:47 AM (IST)
बाळाच्या जन्मानंतरचा पहिला थेंब हा केवळ अन्न नसतो, तर तो प्रतिकारशक्ती, सुरक्षितता आणि मायेचा अमूल्य वारसा असतो. आधुनिक जीवनशैली, वैद्यकीय गुंतागुंत आणि वाढत्या हाय रिस्क – गर्भधारणांमुळे स्तनपानाचे आव्हान वाढत असले तरी आईच्या दुधाचे महत्त्व आजही तितकेच अनन्यसाधारण असल्याचे १ ऑगस्ट या जागतिक स्तनपान दिनी स्पष्ट होत आहे.
Maharashtra to National And International Breaking News:
Maharashtra Govt News: राज्य सरकारने उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात येणारी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिके बंद करण्याचा निर्णय अंशतः मागे घेतला आहे. आता संबंधित मंत्र्यांना ऑनलाइन किंवा मुद्रित अशा दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील सुधारित शासनादेश जारी केला. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून मंत्र्यांना केवळ ऑनलाइन वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागणार होते आणि त्यासाठीचा खर्च संबंधित प्रशासकीय विभागांकडून केला जाणार होता. मात्र, एका दिवसातच या निर्णयात सुधारणा करण्यात आली. ३० जुलैच्या मूळ शासनादेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपवाद ठेवण्यात आला होता. त्यांच्या कार्यालयात आणि अधिकृत निवासस्थानी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिकांचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.