
Maharashtra Breaking News Updates Today:
20 May 2026 11:05 AM (IST)
IPL 2026 च्या RR vs LST सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक ९३ धावांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. वैभवने आपल्या खेळीत केवळ ३८ चेंडूंचा सामना केला, ज्यात १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. जेव्हा त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा त्याने एका अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.
20 May 2026 10:55 AM (IST)
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये शुभमन गिलकडे वनडे (एकदिवसीय) आणि कसोटी (Test) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर कसोटी उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती केली आहे तर वनडे सामन्यामध्ये ही जबाबदारी श्रेयश अय्यर सांभाळणार आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का टीम इंडियाच्या कर्णधाराला किती पगार मिळतो? चला तर मग जाणून घेऊया.
20 May 2026 10:45 AM (IST)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार एनटीआर ज्युनियरने आपल्या चाहत्यांना वाढदिवसाची एक अशी भेट दिली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘ड्रॅगन’ या चित्रपटाची पहिली झलक अखेर प्रदर्शित झाली असून, प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एनटीआर आणि ब्लॉकबस्टर दिग्दर्शक प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
20 May 2026 10:35 AM (IST)
Free Fire MAX मध्ये एक नवीन लक रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक विविध ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईमोट्सद्वारे प्लेअर्स गेममध्ये भावना व्यक्त करू शकतात. प्रत्येक ईमोटमध्ये एक यूनिक अॅक्शन अॅनिमेशन पाहायला मिळतं. पण सहसा प्लेअर्सना हे ईमोट्स खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र गेममध्ये सुरु असलेल्या ईव्हेंटद्वारे प्लेअर्स अत्यंत कमी डायमंड्सचा वापर करून ईमोट्स अनलॉक करू शकणार आहेत.
20 May 2026 10:25 AM (IST)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी (१९ मे) संध्याकाळी इटलीत दाखल झाले आहे. हा त्यांचा पाच युरोपीय देशांच्या दौऱ्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधानव मोदी इटलीत पोहोचताच खास स्वागत केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी शेअर करत स्वागत केले आहे.
20 May 2026 10:00 AM (IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इराणबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. युद्ध लवकरच संपेल असे संकेत देतानाच ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, “आम्हाला युद्धाची वेळ येऊ नये, अशी इच्छा आहे. मात्र, गरज पडल्यास इराणला पुन्हा मोठा झटका द्यावा लागू शकतो,” असे म्हटल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर इराणवरील संभाव्य कारवाईबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून जागतिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, संभाव्य हल्ल्याची कोणतीही अधिकृत तारीख निश्चित झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
20 May 2026 09:55 AM (IST)
पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादात सापडल्याचे समोर आले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका सात वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी चिमुरडीचा डोळ्याच्या शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. मृत्यू झालेल्या मुलीचे नाव प्रियदर्शनी बागडे असे आहे. प्रियदर्शनीला डोळ्यात तिरळेपणा असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. येथे तिच्यावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला काही दिवसांनी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.
20 May 2026 09:50 AM (IST)
Valmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड गेल्या अनेक महिन्यांपासून बीडच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले असून कारागृहातच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला सलाईन लावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भातील या घडामोडीमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.
20 May 2026 09:45 AM (IST)
अकोला: अकोला येथून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने एका तरुणीवर प्रेमाचे नाटक करून लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वर्षापासून सलग अत्याचार आणि फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले तोच व्यक्ती आधीपासून विवाहित असल्याचे समोर आले आहे. जेव्हा ही माहिती तिच्या समोर आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अखेर त्या तरुणाला पोलीस कोठडी झाली आहे.
20 May 2026 09:40 AM (IST)
International HR Day 2026 : सध्याच्या वेगवान आणि स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगतात कोणत्याही कंपनीची किंवा संस्थेची प्रगती केवळ तिथल्या तंत्रज्ञानावर किंवा उत्पादनांवर अवलंबून नसते, तर ती तिथल्या माणसांवर अवलंबून असते. या माणसांना शोधणे, त्यांना कंपनीच्या संस्कृतीशी जोडणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्याचे सर्वात मोठे काम पडद्यामागून एक टीम करत असते, ती म्हणजे ‘मानव संसाधन’ म्हणजेच ह्युमन रिसोर्स (HR) टीम. याच एचआर व्यावसायिकांच्या बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २० मे रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानव संसाधन दिन’ (International HR Day) साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका पदाचा सण नाही, तर कार्यस्थळाला मानवी चेहरा देणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे.
20 May 2026 09:35 AM (IST)
PM Modi Italy Visit May 2026 : जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यात नव्या ‘G2’ समीकरणाची चर्चा रंगत असतानाच, भारताने युरोपच्या भूमीवर आपली सामरिक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या पाच देशांच्या महत्त्वपूर्ण युरोप दौऱ्याचा अंतिम आणि सर्वात हाय-प्रोफाइल टप्पा म्हणून इटलीची राजधानी रोममध्ये दाखल झाले आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्या विशेष निमंत्रणावरून आयोजित केलेला हा दौरा पंतप्रधान मोदींचा इटलीचा पहिला अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. मोदींचे विमान रोममध्ये उतरताच मेलोनी यांनी सोशल मीडियावर मोदींसोबतचा एक खास सेल्फी पोस्ट केला. “रोममध्ये स्वागत आहे, मित्रा,” असे कॅप्शन असलेल्या या सेल्फीने अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, या दोन जागतिक नेत्यांमधील दृढ मैत्रीचे संकेत दिले आहेत.
20 May 2026 09:30 AM (IST)
Paytm Pocket Money Feature: किशोरवयीन मुले व त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ (Paytm) ने नवे ‘पेटीएम पॉकिट मनी’ हे फीचर लाँच केले आहे. आता किशोरवयीन मुले स्वतःचे बँक अकाऊंट न उघडता देखील डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. या नव्या फीचरमुळे पालक मुलांना त्यांच्या खर्चावर लक्ष आणि नियंत्रणही ठेवता येणार आहे.
RCC Nanded: आरसीसी प्रमुख शिवराज मोटेगावकर यास अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी नांदेड शहरातील अनेक नांमांकित कोचिंग क्लासेस पूर्वसूचना न देता बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण होत आहे.
नांदेड जिल्हा हा अलीकडच्या काळात शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जात आहे. या शहरात वेगवेगळे प्रसिद्ध खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. येथे अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश नाममात्र असून खाजगी कोचिंग क्लासेसला त्यांची हजेरी असते. तसेच येथे अनेक कोचिंग क्लासेस चालक पालकांना चांगल्या मार्क्सचे अमिष दाखवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा उगळतात.