Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

महाराष्ट्रासह देश-विदेशातील राजकारण, गुन्हेगारी, क्रीडा, आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्यांचा आढावा.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 09:35 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 24 Aug 2026 09:35 AM (IST)

    24 Aug 2026 09:35 AM (IST)

    Amravati Hospital Fire News:अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला भीषण आग; ३ बालकांचा दुर्दैवी मृत्यू

    Amravati Hospital Fire News: अमरावती  जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात (SNCU) भीषण आग लागून तीन नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नवजात शिशु कक्षातील व्हेंटिलेटरचा अचानक स्फोट झाल्याने ही आग लागली आणि ती वेगाने पसरली. घटना घडली तेव्हा या कक्षात एकूण ९ बालके होती. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • 24 Aug 2026 09:30 AM (IST)

    24 Aug 2026 09:30 AM (IST)

    Solar Eclipse: अमावस्या-पौर्णिमेलाच का लागते ग्रहण? जाणून घ्या यामागचं खगोलशास्त्रीय कारण

    ग्रहण ही एक सामान्य पण आकर्षक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण, या दोन्हीसाठी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत असणे आवश्यक असते. म्हणूनच सूर्यग्रहण नेहमी अमावस्येच्या आसपास आणि चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या आसपास होते. यावर्षातील म्हणजे 2026 मधील पहिले सूर्यग्रहण सूर्यग्रहण देखील अमावस्येच्या दिवशी झाले होते, तर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच रक्षाबंधनाला होणार आहे. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, ग्रहणांचा या दोन विशेष तारखांशी इतका जवळचा संबंध का असतो? इतर कोणत्याही तारखांना ग्रहण का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर विज्ञान आणि आपल्या पौराणिक कथांमध्ये, दोन्ही ठिकाणी अतिशय रंजक पद्धतीने दिले आहे. वाचा सविस्तर- 

  • 24 Aug 2026 09:25 AM (IST)

    24 Aug 2026 09:25 AM (IST)

    Asim Riaz- Himanshi Khurana: असीम रियाजने धर्म परिवर्तनाच्या दाव्यांवर सोडलं मौन

    Asim Riaz- Himanshi Khurana: अभिनेता आणि मॉडेल असीम रियाझ आणि त्याची माजी प्रेयसी हिमांशी खुराना यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. नुकत्याच पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये हिमांशीने त्यांच्या पूर्वीच्या नात्याबद्दल आणि धार्मिक विश्वासांमधील फरकांवर भाष्य केलं. त्यानंतर असीमने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. ‘मी कधीच धर्म बदलायला सांगितलं नाही’

    असीमने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, त्याने हिमांशीला कधीही धर्म बदलण्यास सांगितलं नाही. त्याने लिहिलं, “मी कोणालाही त्यांचा धर्म बदलायला कधीच सांगितले नाही. एकदाही नाही.” धर्मासारख्या संवेदनशील विषयाचा वापर आपल्याविरोधात नकारात्मकता पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्याने केला.

     

  • 24 Aug 2026 09:20 AM (IST)

    24 Aug 2026 09:20 AM (IST)

    CJP Protest Warning To Central Govt: CJPचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

    Cockroach Janta Party: सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर देशात पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा काँक्रोच जनता पार्टीने दिला आहे. सीजेपीने केंद्र सरकारवर तरुणांना दिलेल्या आश्वासनांपासून माधार घेतल्याचा आणि त्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, २५ जुलै रोजी झालेल्या कराराच्या आधारावर देशव्यापी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता सरकार त्या कराराची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटत आहे. वाचा सविस्तर- 

  • 24 Aug 2026 09:15 AM (IST)

    24 Aug 2026 09:15 AM (IST)

    AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावाबाबत नवे आणि धक्कादायक संशोधन समोर आले आहे. राजकीय मुद्द्यांवर लोकांचे मत बदलवून घेण्यात एआय चॅटबॉट्स हे माणसांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात एआयच्या या ‘मन वळविण्याच्या’ क्षमतेमुळे राजकारण, निवडणुका आणि लोकशाही प्रक्रियेवर त्याचा संभाव्य परिणामावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.  वाचा सविस्तर- 

  • 24 Aug 2026 09:11 AM (IST)

    24 Aug 2026 09:11 AM (IST)

    Nagpur Gas Leak Breaking: नागपुरमधील गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती

    Nagpur Godhani Chlorine Gas Leak:  नागपूरच्या गोधनी परिसरात एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती झाल्याचे वृत्त आहे. वायू गळतीमुळे चाळीस जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पाच ते सहा जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. वायू गळतीनंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने संपूर्ण परिसर खाली करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी नागपूरच्या गोधनी परिसरातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती झाल्याने घबराट पसरली. गोधनी नगर पंचायतीच्या अखत्यारीतील जलशुद्धीकरण प्रकल्पात वायू गळती झाल्यानंतर सुमारे ४० जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

Maharashtra to National And International Breaking News: 

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज लक्ष राहणार आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाचा मुद्दाही चर्चेत असून मोठ्या संख्येने नावे वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे भारताकडून प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांशी व्यापारविषयक संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेअर बाजारात जागतिक बाजारपेठेतील संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि मध्यपूर्वेतील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रात महिला हॉकी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीनंतर भारताचे आव्हान संपले आहे.

 

 

Web Title: 24 august 2026 maharashtra to national international breaking news inmarathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
1

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
2

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक
3

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; ४२२ किमीच्या प्रवासात ३६० कंटेनरची विक्रमी वाहतूक

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
4

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.