मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील (Malegaon Blast Case) आणखी एक साक्षीदार फितूर झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे फितूर झालेल्या एकूण साक्षीदारांची संख्या २६ वर (Witness Hostile) पोहोचली आहे.
मालेगावमधील एका मशिदीत २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit), साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pradnyasingh Thakur) यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे.
[read_also content=”मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नागरिकांची तारांबळ https://www.navarashtra.com/maharashtra/heavy-rain-in-mumbai-nrsr-323706.html”]
याआधी दहशतवाद विरोधी पथक प्रकरणाचा तपास करत होते. मात्र त्यानंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला. या खटल्यात चारशेहून अधिक साक्षीदारांची यादी देण्यात आली आहे.गुरुवारी या खटल्यातील प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित संबंधित साक्षीदाराला साक्ष नोंदविण्यासाठी बोलण्यात आले होते. मात्र, त्या साक्षीदाराने आपली जबान फिरवल्यामुळे एनआयएने त्याला फरार म्हणून घोषित केले.