फोटो सौजन्य: Gemini
1 जानेवारी 2026 पासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर नवीन सरकारी कॅब सेवा, भारत टॅक्सी सुरू केली गेली आहे. ही सेवा एका नवीन सहकारी प्लॅटफॉर्मने सुरू केली आहे. भारत टॅक्सीचे उद्दिष्ट परवडणारे, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास प्रदान करणे आहे. या सेवेतील सर्वात मोठा फरक म्हणजे या सर्व्हिसमधून तुम्हाला अधिकचे भाडे द्यावे लागणार नाही.
भारत टॅक्सीला जगातील सर्वात मोठे ड्रायव्हर-मालकीचे नेटवर्क म्हणून सादर केले गेले आहे. राष्ट्रीय राजधानीत या प्लॅटफॉर्मवर 56000 हून अधिक ड्रायव्हर्स रजिस्टर झाले आहेत. मात्र, ही कॅब सेवा अजून तरी देशभरात लागू केलेली नाही.
या सेवेसाठी बुकिंग भारत टॅक्सी मोबाईल ॲपद्वारे करता येते. रायडर्स आणि ड्रायव्हर्स दोघेही हे ॲप प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून सोप्या चरणांमध्ये डाउनलोड करू शकतात. जर तुम्ही रायडर असाल तर तुम्हाला कॅब सेवेसाठी रायडर ॲप डाउनलोड करावे लागेल, तर ड्रायव्हर्सना Driver App डाउनलोड करावे लागेल.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की भारत टॅक्सीने फक्त सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडने जारी केलेले ॲप डाउनलोड करावे. युझर्स नॉन-एसी कॅब, एसी कॅब, बाईक टॅक्सी, अॅस्ट्रा लार्ज (एक्सएल) कॅब, भारत ट्रान्झिट आणि यापैकी कोणत्याही सर्व्हिस निवडू शकतात.
ओला आणि उबरमधील ड्रायव्हर्सना कमिशन द्यावे लागते. मात्र, जर भारत टॅक्सी सेवा कमी किंवा शून्य कमिशन देत असेल, तर ड्रायव्हर्सना प्लॅटफॉर्ममध्ये सामील होण्यास अधिक रस असू शकतो. यामुळे ड्रायव्हर्सची संख्या वाढेल आणि सर्व्हिसचा वेगही वाढेल. टॅक्सी कोऑपरेटिव्हच्या मते, या प्लॅटफॉर्मवरील ड्रायव्हर्सना ग्राहकांनी केलेले पूर्ण पेमेंट मिळेल. ड्रायव्हर्सना भाड्याच्या 80% पेक्षा जास्त रक्कम मिळेल, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळेल.






