Photo Credit- Social Media
पुणे: राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. राजकीय पक्ष कबंर कसून कामाला लागले आहेत. राजकारण तापू लागले आहे. अशातच पुण्यात 32 गाव कृती समितीने मात्र निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. गावांंमध्ये ‘गाव विकणे आहे’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. पुण्यातील 32 गावांमध्ये असे बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्यामुळे ग्रामस्थामी गाव विकण्यासाठी काढले आहे. अशा परिस्थितीत जर कर कमी केला नाही तर 32 गावांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच निर्णय़ घेतला आहे.
पुण्यातील नऱ्हे, नांदेड , उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, धायरी, कोपरे आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला यासह ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या गावांमध्ये ठिकठिकाणी गाव विकण्याचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत समाविष्ट असणाऱ्या 32 गाव कृती समितीने महापालिकेने लावलेल्या कराविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: रश्मी ठाकरे महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्री…, वांद्रे कलानगरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी,
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या अवाजणी करामुळे पुण्यातील 32 गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेचा कर भरू शकत नसल्याने महापालिकेने आमचे गावच विकत घ्यावेस, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यासाठी 32 गावांमधील ग्रामस्थांनी गाव विकणे आहे असे फलक लावत महापालिकेचा निषेध केला आहे.
इतकेच नव्हे तर, पुणे महापालिकेने कोणत्याही सोयी सुविधा न पुरवता भरमसाठ कर लादला आहे, पण सामान्य ग्रामस्थ मात्र कर भरू शकत नसल्याने महापालिकेने आमचे गावच विकत घ्यावे, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे. करामुळे या गावांमधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी भविष्यात मोठ्या आंदोलनाचीही तयारी सुरू केली आहे. तसेच महापालिकेला टाळं ठोकण्याचाही इशारा दिला आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! पुणे पोलिसांचा गणेश मंडळांना दणका; ‘या’ प्रकरणात गुन्हे दाखल