संग्रहित फोटो
धुळे : धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.
धुळ्यातील गिरासे कुटुंबातील दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी भागातील ही घटना आहे. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचं शेजारच्यांना खोटं सांगितलं असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असं मृतांची नावं आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
राज्यात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिकमध्ये देखील काल एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विजय माणिक सहाणे (वय ३८), ज्ञानेश्वरी विजय सहाणे (वय २९) आणि अनन्य विजय सहाणे (वय ९) असं आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. परिसरात याबाबची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की हत्या? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.