फोटो सौजन्य - सोशल मिडीया
बीडमधील बार्शी नाका परिसरातील महालक्ष्मी चौकात ४ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. छोटा हत्ती, रिक्षा, दुचाकी आणि कंटेनर या वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असूनन ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामुळे चौकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तसेच या अपघातात वाहनांंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
महालक्ष्मी चौकात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास छोटा हत्ती, रिक्षा, दुचाकी आणि कंटेनर ही वाहने एकमेकांवर आढळली. कंटेनरची धडक रिक्षाला जोरदार बसल्याने अपघात झाला. तर गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारा छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक बसली. या विचित्र अपघातात रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे चौकात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या विचित्र अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातामुळे स्थानिकांनी चोकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली. यानंतर वाहतूक कोंडी पुन्हा सुरळित झाली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
लातूरमध्ये अपघातात शिक्षकाचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. पत्नीला उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रवी गुळंगे असं या शिक्षकाचं नाव आहे. मलकापूरजवळ नळेगाव रोडवर असलेल्या दालमिलसमोर हा अपघात झाला.