
Maharashtra Breaking News Updates Today
05 Aug 2026 10:20 AM (IST)
देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे हाहा:कार माजला आहे. वीज कोसळणे आणि भूस्खलन यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बिहार आणि बंगालमध्ये वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून, 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बिहारच्या विविध जिल्ह्यांतील 7 आणि बंगालच्या हावडा येथील 4 जणांचा समावेश आहे. पावसाचा परिणाम डोंगराळ राज्यांवरही होत आहे.
05 Aug 2026 10:10 AM (IST)
बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गजनी’, ‘लगान’ आणि ‘सरफरोश’सारख्या गाजलेल्या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे . रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
05 Aug 2026 10:00 AM (IST)
भारतात 5 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,399 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,199 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,799 रुपये आहे. भारतात 5 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,31,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,43,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,07,990 रुपये आहे. भारतात 5 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.
05 Aug 2026 09:46 AM (IST)
Sunetra Pawar Controversial Post: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला कडक शब्दांत सुनावले आहे. "माझ्या आईचा 'गुंगी गुडीया' म्हणून केलेला अपमान हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे," अशा अत्यंत भावूक आणि संतप्त शब्दांत त्यांनी आपला विरोध नोंदवला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत पक्षाची भूमिका कायम ठेवल्याने राजकीय वाद आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी इन्स्टाग्रामवर केलेली ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, महायुतीच्या नेत्यांकडूनही काँग्रेसच्या या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे.
05 Aug 2026 09:39 AM (IST)
Trump Security Threat: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा मोठा कट सुरक्षारक्षकांनी उधळून लावला आहे. लॉस एंजिलिस येथील ट्रम्प यांच्या 'नॅशनल गोल्फ क्लब'च्या बाहेरून एका ३८ वर्षीय संशयित व्यक्तीला शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली आहे. 'जीनिन जॉन टेले' असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो कॅलिफोर्नियातील डाउनी भागातील रहिवासी आहे.
लॉस एंजिलिस काऊंटी शेरिफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोल्फ क्लबच्या पार्किंगमध्ये संशयित कार दिसल्यानंतर त्याला रोखून तपासणी करण्यात आली. या वेळी आरोपीच्या कारमध्ये एक पिस्तूल आणि अत्यंत घातक मानले जाणारे 'आर्मर पियर्सिंग' (बुलेटप्रुफ जॅकेट भेदणारे) साहित्य आढळून आले. ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.
05 Aug 2026 09:33 AM (IST)
Maharashtra Weather: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील घाटमाथ्यासाठी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. तसेच पूर्व विदर्भासह नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि मॉन्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै पाठोपाठ आता ऑगस्ट महिन्यातही पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. विशेष म्हणजे मॉन्सूनवर सध्या एल निनोचा कोणताही प्रतिकूल प्रभाव दिसून येत नसल्याने बळीराजा सुखावला आहे.
05 Aug 2026 09:25 AM (IST)
Yemen Vessel Attack: येमेनच्या किनाऱ्याजवळ 'MSV फैझ नूरे औलिया' या भारतीय जहाजावर क्षेपणास्त्राने (प्रोजेक्टाईल) भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे संतुलन बिघडल्याने हे जहाज समुद्रात उलटून बुडाले. मात्र, येमेन कोस्ट गार्डने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत जहाजावरील १३ भारतीय खलाशांसह सर्व १४ जणांना सुरक्षित बाहेर काढले असून, त्यांना मोखा बंदरात हलवले आहे.
इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेचा भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडिया 'X' वर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आणि हा हल्ला अत्यंत उकसवणारा असल्याचे सांगत त्याचा कठोर शब्दांत निषेध केला.
05 Aug 2026 09:10 AM (IST)
Maharashtra Voter List: राज्यातील विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रक्रियेनंतर २४ ऑगस्ट रोजी राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांना २३ सप्टेंबरपर्यंत आपल्या नावावर दावे आणि हरकती नोंदवता येतील. मिळालेल्या दावे व हरकतींवर नोटिसा बजावणे, सुनावणी घेणे आणि त्यांचा निपटारा करण्याची संपूर्ण प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.
05 Aug 2026 09:05 AM (IST)
Shivsena Dispute: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून लवकरच होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील या ६ पैकी २ खासदारांना थेट केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ठाकरे गटातील काही आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
05 Aug 2026 08:54 AM (IST)
Pradeep Rawat Death: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गजनी’, ‘लगान’ आणि ‘सरफरोश’सारख्या गाजलेल्या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे . रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Pradeep Rawat Death)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप रावत गेल्या पाच वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते. उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत काही काळ सुधारणा झाली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आजार पुन्हा बळावला. गेल्या दोन महिन्यांपासून ते रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
05 Aug 2026 08:52 AM (IST)
India Share Market Update: जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करता आज ५ ऑगस्ट रोजी बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडने देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा १७७.४-पॉइंटच्या प्रीमियमवर, सुमारे २४,७३३ वर ट्रेड करत होता.
Maharashtra to National And International Breaking News:
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतरमंतरवरील आंदोलनानंतर देशभरातून पक्षाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीची पुढची वाटचाल कशी असेल, पक्षाची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यासाठी आज अभिजीत दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपीच्या कोअर कमिटी दोन दिवसीय महत्त्वपूर्ण रणनीतिक बैठक होणार आहे. या बैठकीत देशभरातून आलेले समन्वयक व कोअर कमिटीचे सदस्य सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सीजेपीच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.