पुणे : दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी पुणे-बंगळूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून सांगलीच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातल्या कासेगावजवळ हा अपघात झाला. येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठिमागून कार जोरात धडकली. या अपघातात यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
[read_also content=”कार्तिक आर्यननतंर अभिनेता आदित्य रॉय कपूरला कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/latest-news/after-kartik-aryan-actor-aditya-roy-kapoor-got-corona-infection-nrps-288836.html”]
अरिंजय अण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरू अभिनंदन शिरोटे यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला
[read_also content=”कार्तिक आर्यननतंर अभिनेता आदित्य रॉय कपूरला कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/movies/during-a-performance-at-the-iifa-awards-honey-singh-touched-a-r-rahman-feets-nrps-288821.html”]