
महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
कोल्हापूर मुंबादिनी नवराष्ट्र वयात ‘महादेवी’ (माधुरी) हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जामनगर येथील रिलायन्स फाऊंडेशनच्या ‘वनतारा’ वन्यजीव संरक्षण केंद्रात पाठवण्यावरून झालेला वाद काही महिन्यांपूर्वीच ‘महादेवी’ च्या पुनरागमनानंतर शांत झाला होता. आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्राणीप्रेमींना डिवचणारा दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. सरकार आता राज्यातील ५० बिबटे नाराला देण्याच्या तयारीत आहे तर्क आहे की, राज्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबटे निवासी भागात येत असल्याने मानव-बिबट्या संघर्ष वाढला आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी बिबट्यांना वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, विविध रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ६७ बिबटे पकडण्यात आले आहेत, ज्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर केले जाईल, त्यापैकी ५० बिबटे वनताराला पाठवले जातील.(फोटो सौजन्य – istock)
काळजी घ्या ! यंदा उष्णतेच्या सर्वाधिक बसणार झळा; विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय घेतल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने वनतारा केंद्राची पाहणी केली आणि तिथली परिस्थिती अनुकूल असल्याचे आढळल्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. वनविभागाने पहिल्या टप्प्यात स्थलांतरित करण्यासाठी सुमारे २० बिबट्यांची ओळख पटवली आहे. जुन्नर विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या माहितीनुसार, प्राण्यांची पहिली तुकडी एका आठवड्याच्या आत जामनगर सुविधा केंद्रात पोहोचेल.
नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक ची. एन. कुमार म्हणाले की, “गणेश नाईक यांच्या अलीकडील ट्विटवरून स्पष्ट होते की अनेक बिबट्यांचे स्थलांतर केले जाईल, हे चुकीचे आहे, कारण या शिकारी प्रजातीला त्यांच्या नैसर्गिक वन अधिवासात राहण्याची गरज आहे. त्यांना एखाद्या प्राणीसंग्रहालयात किंवा केंद्रात पाठवणे हा योग्य उपाय नाही.
Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ
बीडचे वन्यजीव कार्यकर्ते नितीन अलकुटे यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील छोट्या पिंजऱ्यात ठेवलेल्या २१ बिबट्याच्या सुटकेसाठी मी तीन महिन्यांपासून संघर्ष करत आहे. एका बिबट्याचा मृत्यूही झाला आहे. वनविभाग त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यास तयार नाही, ही क्रूरता आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.