वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बुलढाणा : ‘मी मेलो तरी चालेल पण बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे’, असे म्हणत ज्ञानेश्वर सावळे या संतप्त शेतकऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहकारी शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेत सावळे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आमच्या मालाची यांना किंमत नाही, किती दिवस संयम ठेवायचा? आता संयम सुटला आहे, असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : Ratnakar Gutte’s grandson Sumit Gutte Missing: आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू, सुमित गुट्टे पुण्यातून बेपत्ता
ज्ञानेश्वर दिनकर सावळे (रा. डोंगरशेवली ता. चिखली, जि. बुलढाणा) असे संतप्त शेतकऱ्याचे नाव आहे. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील अहिल्याबाई सहकारी संस्थेच्या हमीभाव केंद्रावर ही घटना शनिवारी (दि. 4) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. सावळे अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब सोबतच्या सहकारी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी सावळे यांना रोखले. यामुळे मोठा अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील अहिल्याबाई सहकारी संस्थेच्या हमीभाव केंद्रावर ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शेतकरी नेते विनायक सरनाईक हेदेखील घटनास्थळी पोहोचले होते.
3 दिवसांपासून सोयाबीन गाडीत
केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रखडली होती. डोंगरशेवली येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिनकर सावळे यांनी त्यांच्या शेतातील अंदाजे 50 क्विंटल सोयाबीन सोमठाणा येथील ‘आम्ही भाऊ केंद्रा’वर आणली होती. गेल्या 3 दिवसांपासून सोयाबीन गाडीत पडून होते. सोयाबीन खरेदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा अखेर धीर सुटला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.
बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव
बारदाना उपलब्ध नसल्याने 3 दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडली आहे. सोयाबीन खरेदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने केंद्रातच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. सोबतच्या शेतकऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.
हेदेखील वाचा : माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; 82 व्या वर्षी पत्नीने घेतला अखेरचा श्वास