गजानन किर्तीकर यांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांचे मुंबईमध्ये दुःखद निधन झाले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. मेघना गजानन कीर्तिकर यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणानंतर मेघना कीर्तिकर यांचे निधन झाले आहे.
आज रविवारी 05 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता मेघना गजानन कीर्तिकर त्यांची प्राणज्योत मालवली. मागील अनेक दिवसांपासून मेघना गजानन कीर्तिकर या आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेघना कीर्तिकर यांच्या जाण्याने गजानन किर्तीकर आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मेघना किर्तीकर त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मेघना कीर्तिकर यांचे पार्थिव संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान अंत्यदर्शनसाठी त्यांच्या गोरेगाव पूर्वमधील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यानंतर शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व) या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
एकाच घरात दोन गट
काही वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये बंड करुन एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. यामध्ये उद्धव ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट पडले. यामध्ये कीर्तीकर कुटुंबामध्ये देखील दोन राजकीय गट पडल्याचे दिसून आले होते. गजानन किर्तीकर हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. पण गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला आणि ते शिंदे गटामध्ये सामील झाले. तर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्यामुळे कीर्तीकर कुटुंबामध्ये राजकीय दोन गट पडल्याचे दिसून आले होते. अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवले होते. अमोल कीर्तिकर हे उद्धव गटाच्या शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागेचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे (शिवसेना) उमेदवार रवींद्र वायकर यांनी चुरशीची लढत दिली. यामध्ये अमोल किर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी झाले. यामुळे अमोल कीर्तीकर यांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. अमोल कीर्तीकर यांना मातृशोक झाला असून त्यांच्या आई मेघना कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.