File Photo : Crime
मलकापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) अविश्वास सभेच्यापूर्वीच हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांसोबत बाचाबाची, बाजार समिती प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार चैनसुख संचेतींसह (Chainsukh Sancheti) खासगी अंगरक्षक अशा 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले. तसेच पोलिसांनी शांततेचे आवाहन करून सुद्धा घोषणाबाजी सुरूच ठेवली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मनोज उमाळे यांनी फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून, माजी आमदार चैनसुख संचेती, यश सुरेशकुमार संचेती, राहुल ऊर्फ बबलू देशमुख, अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत, संदीपसिंह नारायणसिंह राजपूत, शुभम संजय काजळे, ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे, करणसिंह राजपूत, चंद्रकांत वर्मा असे 9 व 15 ते 20 बाउन्सर (खासगी अंगरक्षक) अशा 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.