कल्याण : कल्याण पूर्वेतील (Kalyan East) मलंगगड रोड (Malanggad) परिसरात महापालिकेची स्मशानभूमी (Municipal Cemetery) नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांच्या सोयीसाठी कल्याण पूर्वेतील नांदिवली (Nandivali) परिसरात स्मशानभूमी उभारण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाची (Aai Ekvira Mahila Mandal) असून याबाबत मंडळामार्फत ११ एप्रिल रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता व कार्यकारी अभियंता यांना नवीन स्मशानभूमी बांधण्याकरीता आई एकविरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी संदीप क्षीरसागर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.
त्या निवेदनाची दखल संबंधित कार्यालयांनी घेऊन १ मे रोजी उप अभियंता योगेश गोटेकर तसेच सहाय्यक अभियंता रविंद्र अहिरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पहाणी केली. नांदिवली तलावा शेजारी केडीएमसीच्या माध्यमातून अमृत प्रकल्प योजनेअंर्तगत पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामधील ५०० मी. जागेमध्ये सार्वजनीक स्मशानभूमी उभी करण्यात येऊ शकते तसेच तेथे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. या जागेवर लवकरात लवकर परवानगी देऊन तेथे सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्यात सहकार्य करावे व कल्याण पूर्व मधील नागरीकांना न्याय मिळवून देण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाने केली आहे.
[read_also content=”बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, अटक करत राजीनामा घेण्याची केली मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/youth-congress-protest-in-kalyan-against-brijbhushan-singh-demand-arrest-and-resignation-nrvb-397029.html”]
तर ही स्मशानभूमी उभारण्यासाठी आई एकविरा महिला मंडळाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून नांदिवली येथे स्मशानभूमीसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे खासदार कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने लवकरात लवकर याठिकाणी स्मशानभूमी उभारण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 9 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-9-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]