केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य
केसांचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शाम्पू केसांवर लावले जातात. केसांच्या चमकदार वाढीसाठी मुली बऱ्याचदा केसांना हेअर डाय, कलर किंवा मेहेंदी लावतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टमुळे केसांना हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांची मूळ कमकुवत झाल्यानंतर केस अचानक तुटणे, केसांमध्ये कोंडा, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय केस सुंदर दिसावे वेगवेगळ्या केमिकल युक्त ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर दिसतात, पण कालांतराने केसांच्या समस्या वाढतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण
जास्वंदीचे फुल केसांसाठी वरदान मानले जाते. या फुलात असलेले गुणकारी घटक केस चमकदार आणि नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यासाठी मदत करतात. जास्वंदीला नॅचरल हेअर केअरचा घटक सुद्धा मानले जाते. जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क किंवा हेअर केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक वाढते आणि केस अतिशय सुंदर दिसतात. नॅचरल कंडिशनर केसांना मऊ, चमकदार आणि मजबूत करण्यास मदत करते. कंडिशनर कायमच खालच्या केसांवर लावावे. स्कल्पवर लावल्यास केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. जास्वदींच्या फुलांपासून बनवलेले नॅचरल कंडिशनर केसांमध्ये कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.
जास्वंदीची फुलं
अळशीच्या बिया
डिंक
पाणी
जास्वदींच्या फुलांचे कंडिशर बनवण्यासाठी सर्वप्रथम, फुलांचे देठ काढून काहीवेळ फुले पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात जास्वदींची फुले काहीवेळ भिजत ठेवा. ६ ते ७ तास भिजल्यानंतर पाण्याला सुंदर लाल रंग येईल. दुसऱ्या वाटीमध्ये अळशीच्या बिया भिजत ठेवाव्यात. वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात डिंक भिजत ठेवावे. भिजवून घेतलेले सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये जास्वदींच्या फुलांचे पाणी मिक्स करून घ्या. चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले कंडिशर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
तयार केलेले कंडिशर केस शाम्पूच्या सहाय्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कंडिशर लावावे. कंडिशर खालच्या केसांना लावावे. २ ते ३ मिनिटं हलक्या हाताने मसाज करून झाल्यानंतर केस पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जास्वदींची फुले केसांमध्ये नैसर्गिक ओलावा कायम टिकवून ठेवतात. कोरड्या आणि निर्जीव केसांना नैसर्गिक ओलावा देण्यासाठी कंडिशरचा वापर करावा.केसांमध्ये वाढलेला कोंडा किंवा खाज कमी करण्यासाठी जास्वदींची फुले आणि डिंक प्रभावी ठरते.






