नागपूर – शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जरी सत्तारांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी यामुळे वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेत राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांना शिंदेसोबत बंड केले होते. यानंतर त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांना कृषी खाते देण्यात आले असले, तरी ते अल्पसंख्याक मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले होते. यामुळे आज त्यांनी काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची भेट घेत २० मिनिटे चर्चा केल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.






