Abuse Of Disabled Woman A Case Has Been Registered Against 2 People Nrdm
तोंडात बोळा कोंबून दिव्यांग महिलेचा अत्याचार; 2 जणांवर गुन्हा दाखल
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 42 वर्षीय जन्मजात दिव्यांग असलेल्या महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तीच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवेढा : मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 42 वर्षीय जन्मजात दिव्यांग असलेल्या महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तीच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पिलीक उर्फ पिलक्या नबी खाटीक, इब्राम उर्फ इब्य्रा अलीसाब मुलाणी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पिडीत महिलेच्या आईची तब्येत ठिक नसल्याने ती (दि.7) रोजी सकाळी 9.00 वाजता उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेली असल्याने 42 वर्षीय पिडीता ही घरात एकटीच होती. दवाखान्यात उपचार केल्यानंतर सदर पिडीतेची आई घराकडे न येता मुलगा रहात असलेल्या ठिकाणी गेल्याने रात्रीचा मुक्काम तिथेच केला.
या दरम्यान घरामध्ये पिडीता एकटीच असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी रात्री 11.00 वाजता घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश करून पिडीतेच्या तोंडात कपडयाचा बोळा घालून दोघांनी अत्याचार केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर पिडीतेने आरोपीला तुमच्यावर केस करणार असल्याचे म्हणताच आरोपीने तुला कोठे केस करायची आहे तेथे कर असे म्हणून निघून गेले.
पिडीतेला त्रास होवू लागल्यानंतर पिडीता रात्रभर झोपलीच नाही. सकाळ झाल्यानंतर शेजारी राहणार्या व्यक्तीला घडला प्रकार सांगून पिडीतेच्या आईला फोन करून बोलावून घेवून पोलिसात तक्रार दिली असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस अधिकारी करीत आहेत.
Web Title: Abuse of disabled woman a case has been registered against 2 people nrdm