हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर (संग्रहित फोटो : अपघात)
कसारा : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस उलटून अपघात झाला. या अपघातात 17 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसाराखुर्द गाव हद्दीत घडली. हे वऱ्हाड मुंबई-कुलाबा येथून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणी जाताना हा अपघात घडला.
हेदेखील वाचा : नाराज शिवसैनिकांच्या मनधरणीकरिता अंबादास दानवेंची मध्यस्थी, बैठकीनंतरही शिवसैनिकांचा निर्णय पक्का
कुलाबा येथून लग्न सोहळ्यासाठी सिन्नर येथे जात होते. यावेळी खासगी बसने 17 वऱ्हाडी प्रवास करत होते. कुलाबाहून बस कसारा घाटाच्या पायथ्याशी चिंतामणवाडी गाव वस्तीसमोर महामार्गाच्या नागमोडी वळणावर येताच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवर घासत पलटी झाली. या अपघातात 17 प्रवाशांपैकी 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, इतर किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकातील स्वप्नील कलंत्री, देवा वाघ यांच्यासह पांडुरंग खाडे आणि चिंतामणवाडी वस्तीतील तरुणांनी जखमींना बसमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी कसारा व खर्डी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
वरंध घाटात एक भीषण अपघात
पुणे जिल्ह्यातील भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. महाडवरून भोरच्या दिशेने इको ही कार येत होती. तेव्हा ही दुर्घटना घडल्याची माहिती दिली जात आहे.
परंडा तालुक्यातील हरणवड्याजवळ अपघात
परांडा तालुक्यातील सोनारीजवळ एक भीषण अपघात झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना परंडा तालुक्यातील सोनारीमधील हरणवड्याजवळ घडली. या अपघाताची माहिती मिळताच सोनारी व कंडारी येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्रा पाटणे (वय 59) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
हेदेखील वाचा : ‘मी पाहुणा नाही तर इथला मुखिया, मायभूमीत आल्याचे मला समाधान’; केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे भावूक उद्गार