Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray on Sachin Ahir: कारवाई तर होणारच! सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा

Aditya Thackeray on Sachin Ahir: सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते

  • By anuradha sagar
Updated On: Jun 30, 2026 | 04:14 PM
Sachin Ahir, Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Eknath Shinde

Sachin Ahir, Aditya Thackeray, Uddhav Thackeray, Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • स्वार्थासाठी जवळचे लोक सोडून गेले- आदित्य ठाकरे
  • वरळी-शिवडी आमचे बालेकिल्ले, कोणाच्या जाण्याने धक्का बसत नाही – आदित्य ठाकरे
  • ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ – आदित्य ठाकरे
Aditya Thackeray on Sachin Ahir:  शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. खासदारांच्या पक्षांतराला महिना उलटत नाही तोच ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सहकारी सचिन अहिर यांनीदेखील ठाकरेंची साथ सोडली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा विदर्भाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या काही चार दिवसांतच सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचेही जाहीर केले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सचिन अहिर यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. “पक्षांतराबाबत योग्य अशी कारवाई असेल ती आम्ही निश्चितपणे करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेच्या प्रवेशाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ” ज्या जवळच्या लोकांना पक्षाकडून सर्वकाही मिळतं, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जातात. त्यामुळे आता धक्का बसण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. वरळी आणि शिवडी हे आमचे बालेकिल्ले आहेत. तिथे आम्ही सातत्याने कामही केलं आहे. त्यामुळे आता कोणाच्या जाण्याने आम्हाला धक्का बसत नाही.

सत्ताधारी गटावर निशाणा साधताना निशाणा साधला. “अजून काय पाहिजे होतं तुम्हाला, अजून किती ओरबाडणार आहात? इतकी पदं देऊनही अजून काय हवंय? आपल्या मंदिरांना लुटणाऱ्यांसोबतच तुम्ही कसे बसू शकता. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता?” असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

Chandrakant Patil: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा खासदार विशाल पाटलांना थेट इशारा

“या सगळ्या पक्षांतराचा आम्ही अभ्यास केला. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे,” असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. सचिन अहिर यांच्या उपसभापती पदाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भाजपचाच एखादा कार्यकर्ता का निवडला गेला नाही, याचा भाजपने विचार करायला हवा, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षासाठी काम करत आहेत. त्यांना का कोणतेही मोठे पद मिळत नाही, असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.

सचिन अहिर आदित्य ठाकरेंचा ‘उजवा हात’

सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा वरळीची संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी अहिर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या जाण्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो.

 

Web Title: Aditya thackeray warns strict action sachin ahir flips shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Eknath shinde Shivsena
  • Maharashtra Politics
  • Sachin Ahir
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
3

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.