फोटो - टीम नवराष्ट्र
बदलापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यानंतर राज्य सरकार व पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापना केली गेली आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत याचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकमांच्या नियुक्तीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. त्याला उज्वल निकम यांनी देखील प्रत्यत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उज्वल निकम म्हणाले, ”विरोधी पक्षनेत्यांना किती काळजी आहे हे यातून स्पष्ट होते. जिभेला हाड नसते असे म्हणतात परंतु,हाड नसले तरी बेछूट आणि बेताल आरोप करण्याकरिता हे प्रसिद्ध आहेत. २६/११ च्या हल्ल्यात करकरेंचा मृत्यू दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्या गोळीबारात झाला होता असं सुप्रीम कोर्टाने निक्षून सांगितल्यावर देखील त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र ते आज या प्रकरणात राजकारण आणून असे प्रश्न उपस्थित करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा खटला मी चालवत होतो तेव्हा केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार होते. त्यावेळेस त्यांचा काय आटापिटा चालला होता. त्यावेळी कोणत्या अभिनेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. त्यामुळे बेछूट आरोप करू नका. आरोपी कोणत्याही पक्षाचा असूदेत, तो जर का आरोपी असेल आणि त्याच्याविरुद्ध पुरावे असतील तर मी त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो.”
काल जे आंदोलन झाले तो लोकांचा उद्रेक होता. अत्याचार झालेल्या बालिका या लहान बालिका आहेत. त्यामुळे त्या नराधमाला चौकामध्ये फाशी द्यायला हवी. एवढा मोठा हा अक्षम्य गुन्हा आहे. शाळेच्या संस्थाचालकाला वाचवाण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे मोबाईल ट्रेस केले पाहिजेत. त्यानंतर सर्व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपचे उज्वल निकम यांची नियुक्ती? बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? पोलिसांवर पोलिसांचा धाक राहिला नाही. राज्यात आजच्या घडीला कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी वकील म्हणून भाजपचे उज्वल निकम यांची नियुक्ती?
बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केली, ज्याने निवडणूक लढवली.… pic.twitter.com/flm5pZ98aQ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 21, 2024
दरम्यान, बदलापूर घटनेत मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आंदोलक माघार घेण्यास तयार नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तर तब्बल १,५०० पेक्षा जास्त आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना कल्याण कोर्टात हजर केले. यावेळी कोर्टाने २२ आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . कोर्टाने आंदोलकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर आंदोलकांचे वकील जामिनासाठी याचिका करणार आहे. कोर्टाने कोठडीचा निर्णय सुनावताच आंदोलकांच्या नातेवाईकांनी कोर्टाच्या परिसरातच हंबरडा फोडला.