मुंबई : सध्या हिवाळी अधिवेशन वेगळ्याच कारणावरुन गाजत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी लोकसभेत खासदार राहुल शेवाळेंनी केली. तसेच दिशाच्या मोबाईलमध्ये ‘एयू’ असा उल्लेख आढळल्यामुळं त्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे, त्यामुळं याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताहेत, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणची एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण ताजे असताना आता ‘एयू’ नंतर ‘ईएस’ कोण आहे? याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
[read_also content=”कसं होतं राज्यातील राजकीय वर्ष…,जाणून घ्या 2022 मधील 10 महत्त्वाच्या घडामोडी https://www.navarashtra.com/look-back-2022/how-was-the-political-year-in-the-maharahtra-know-ten-important-developments-in-two-thousand-twenty-two-356502.html”]
दरम्यान, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. यानंतर प्रकरणी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि या नैराश्यातून मी आत्महत्या करत आहे, अशी नोंद सूरज परमार यांच्या डायरीत सापडली आहे. तसेच ‘एयू’ असा उल्लेख आढळल्यामुळं या चार नगरसेवकांसह ठाण्यातील नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे सुशंयाची सुई सरकते आहे, ‘एयू’ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात आहेत, त्यामुळं या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. एकीकडे ‘एयू’ नंतर आता ‘ईएस’ची एसआयटी चौकशी होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, राजकीय जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. आपल्याला त्रास देणार्या सहा राजकीय व्यक्तींची नावेही परमार यांनी या चिठ्ठीत लिहिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, नंतर ‘ही नावे लिहिल्याने आपल्या कुटुंबाला त्रास होईल’, असे त्या चिठ्ठीतच नमूद करतानाच परमार यांनी स्वत:च ही नावे खोडली होती. ही चिठ्ठी राज्याबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली असता, ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचीच असल्याचे धक्कादायक समोर आहे. दोन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, एक नगरसेवक मनसे आणि एक काँग्रेसचा असल्याची माहिती पोलीसांनी दिली.