मुंबई : देशात पश्चिम रेल्वेचं जाळे सर्वंत्र पसरले आहे. मुंबईत सुद्धा पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहयला मिळते. तसेच पश्चिम रेल्वेची सेवा देखील जलदगतीने असते. रेल्वे सेवेत अग्रणीय असलेल्या पश्चिम रेल्वेला मात्र रेल्वे मंत्रालय दुजाभाव वागणूक देत होते. मागील 9 महिन्यापासून पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक नसल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करताच रेल्वे मंत्रालयाला जाग आली आहे. परिणामी अशोककुमार मिश्रा यांची पश्चिम रेल्वेच्या नवीन महाव्यवस्थापक पदी नेमणून करण्यात आली आहे. त्यामुळं रेल्वेला आता नवीन महाव्यवस्थापक मिळाला आहे.
[read_also content=”देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार? राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnavis-and-uddhav-thackeray-will-come-together-again-fadnavis-said-343311.html”]
दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापका बाबत विविध माहिती विचारली होती. पश्चिम रेल्वेच्या उपमुख्य कर्मचारी अधिकारी रामप्रसाद बी यांनी अनिल गलगली यांस कळविले की 1 फेब्रुवारी 2022 पासून पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पद रिक्त आहे. सद्या प्रकाश बुटानी जे अप्पर महाव्यवस्थापक आहेत. त्यांस प्रभार देण्यात आला आहे. या नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकरण रेल्वे बोर्ड असून, सक्षम प्राधिकारी यांच्या नावाची माहिती रेल्वे बोर्डाकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला. अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री आणि प्रशासनास पत्र पाठवून मागणी केली आहे की, तत्काळ हे रिक्त पद भरण्याची मागणी केली होती. त्यांचा मागणीला यश आले असून, 9 महिन्यानंतर पश्चिम रेल्वेला महाव्यवस्थापक लाभले आहे. त्यामुळं कर्मचारी विभागाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.