मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे (Agricultural Minister Dada Bhuse Supporting Eknath Shinde) यांनी देखील शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
[read_also content=” आधी मविआतून बाहेर पडा मगच चर्चा करू : एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/live-updates-maharashtra-political-cricis-mla-out-of-maharashtra-come-to-mumbai-and-talk-to-udhhav-thackeray-says-sanjay-raut-nrvb-296052.html”]
एकनाथ शिंदेंनी आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळत आहे. शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली. शिंदे यांना उद्देशून ही त्यांनी भावनिक साद घातली. त्यांच्या आवाहनानंतर देखील काही आमदार शिंदे यांच्या गटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली असल्याने शिवसेना एकटी पडत आहे.
उद्धव ठाकरे यांनी संवादातून आमदारांना देखील आवाहन केले. माझ्यासमोर येऊन राजीनामा मागा, मी द्यायला तयार आहे, यावेळी त्यांच्यासोबत असलेले आमदार देखील आज शिंदे गटाकडे पसार झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे जात असताना काही मंत्र्यांना स्वतःच्या गाडीत वर्षावरून हॉटेल सेंट रेजिसला घेऊन गेले होते. त्यात गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, सदा सरवणकर, संतोष बांगर ही सर्व मंडळी देखील शिंदे गटाला मिळाली आहेत.