Sports Coach Fined Rs 3 Lakh 10 Thousand Including Life Imprisonment For Sexually Abusing A Minor Girl Nraa
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाला आजन्म कारावासासह ३ लाख १० हजाराच्या दंडाची शिक्षा
आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे हा अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करावीत असे. हा क्रीडा प्रशिक्षक मुलीला संघातून काढून टाकण्याची धमकी देत तर, जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करीत होता. यातून अल्पवयीन पीडिता गरोदर असल्याचे उघडकीस आले.
अकोला: अल्पवयीन मुलींचे वारंवार लैंगिक शोषण व अन्य एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्रीडा प्रशिक्षकांना विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हीडी पिंपळकर यांच्या न्यायालयाने आजन्म कारावासाची व ३ लाख १० हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे हा अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करावीत असे. हा क्रीडा प्रशिक्षक मुलीला संघातून काढून टाकण्याची धमकी देत तर, जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करीत होता. यातून अल्पवयीन पीडिता गरोदर असल्याचे उघडकीस आले. ३० जुलै २०१८ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला याबाबत पीडितेने तक्रार नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
[read_also content=”अखेर त्या दोन बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध लागला ! चाईल्ड लाईनचे प्रशंसनीय कार्य ! https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/the-search-for-the-two-missing-minor-girls-finally-began-admirable-work-of-child-line-nraa-256262.html”]
यामध्ये पीएसआय संजय कोरचे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हीडी पिंपळकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार तर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणी भादवी कलम ३७६(२)(एन) व पॉक्सो कायदा कलम ३-४-५ मध्ये आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे याला दोषी ठरवून आजन्म कारावास, अन्य एका मुलीचा विनयभंग प्रकरणी ५ वर्षे कारावास, कलम ५०६ मध्ये २ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. व विविध कलमा अंतर्गत एकूण ३ लाख १० हजाराचा दंड ठोठावण्यात आला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे, किरण खोत यांनी बाजू मांडली. एलपीसी अनुराधा महल्ले, सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.
Web Title: Sports coach fined rs 3 lakh 10 thousand including life imprisonment for sexually abusing a minor girl nraa