Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Nashik Railway Project: आंबेगाव-जुन्नर रेल्वे मार्ग बदलला; आंबेगाव-जुन्नरच्या विकासाला धक्का

रेल्वे आंबेगाव-जुन्नर मार्गे गेली असती तर व्यवसायाला नवी दिशा मिळाली असती, मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि बाहेरून ग्रहक येण्यासाठी मोठी सोय झाली असती. हा निर्णय ऐकून तीव्र नाराजी वाटते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2025 | 03:48 PM
Ambegaon Junnar railway route, Shirdi railway alignment,

Ambegaon Junnar railway route, Shirdi railway alignment,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय
  • आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव्र संताप
  • आंबेगाव आणि जुन्नर परिसर पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा
Pune Nashik railway project: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे वळवण्याचा निर्णय जाहीर होताच आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे मार्ग बदलल्याने विकासाला मोठा धक्का बसला असून पर्यटन आणि उद्योगक्षेत्रात नाराजीची भावना तयार झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून आंबेगाव-जुन्नर या भागातून रेल्वेमार्ग जाणार अशी आशा नागरिक, व्यावसायिक, शेतकरी आणि पर्यटन क्षेत्राला होती. तीन वेळा याच मार्गाचे सर्वेक्षण झाले, खेड-मंचर परिसरात भूसंपादनही करण्यात आले. काही शेतकऱ्यांना तर भूसंपादनाचा मोबदला देखील मिळाला. त्यामुळे रेल्वे मार्ग निश्चित झाला असल्याचा विश्वास निर्माण झाला होता. मात्र आता रेल्वे मार्ग शिडींकडे वळवल्याने या दोन तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी खिळ बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महिला खासदारांनी धरला ठेका! खासदार सुप्रिया सुळे, कंगना राणौत अन् महुआ मोईत्रा यांचा Dance Video Viral

आंबेगाव आणि जुन्नर परिसर पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी क्षेत्रही आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरासारखे जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक स्थळ, अष्टविनायकांतील ओझर व लेण्याद्री, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ही ऐतिहासिक स्थळे रेल्वे मार्ग बदल्यामुळे रेल्वे रुळापासून दूर गेली आहेत. त्यामुळे पर्यटनाला मिळणारा वाव कमी झाला असून या निर्णयामुळे या भागातील आर्थिक प्रगती कोलमडणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रेल्वे आंबेगाव-जुन्नर मार्गे गेली असती तर व्यवसायाला नवी दिशा मिळाली असती, मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि बाहेरून ग्रहक येण्यासाठी मोठी सोय झाली असती. हा निर्णय ऐकून तीव्र नाराजी वाटते.

प्रवीण शिंदे, सचिव, आआंबेगाव तालुका व्यापारी असोशिएशन मंचर

८८ शिवनेरी, भीमाशंकर, ओझर येथे पर्यटन प्रचंड आहे. रेल्वेमुळे पर्यटकांचा ओघ वाढून हॉटेल उद्योग दुप्पट वाढला असता. आता मार्ग बदलल्याने विकास थांबणार अशी भीती आहे, असे मत मंचर येथील हॉटेल व्यावसायिक संदेश बागल व घोडेगाव येथील हॉटेल व्यवसायिक धनंजय फलके यांनी व्यक्त केले.

भूमीपुत्रांच्या जागा घेऊनही विकास नाही; KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल

– धनंजय फलके, हॉटेल व्यवसायिक

योग्य पातळीवर पाठपुरावा न झाल्याची चर्चा

रेल्वे मार्ग या भागातून गेल्यास उद्योगपती, पर्यटन क्षेत्र, शिक्षण संस्था, व्यापारी वर्ग आणि स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला असता. परंतु मार्ग बदलल्याने विकासाची अडथळ्यात अडकणार असल्याची – भीती निर्माण झाली आहे. आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांना रोजगार, जोडधंदे, गाडी बाजारपेठ आणि सोयीसुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा – होती. रेल्वेमुळे या दोन तालुक्यांचा नकाशाच पालटेल, असा विश्वास नागरिकांना होता.

आता हा प्रकल्प दूर गेल्याने “विकासाचे दार बंद झाले” अशी नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रयता आणि योग्य पातळीवर पाठपुरावा न झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. अनेक वर्षांपासून आशा लावून बसलेल्या नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना वाढत आहे. रेल्वे प्रकल्पावर पुनर्विचार व्हावा, असा जोरदार आवाज उठू लागला आहे.

८८ रेल्वे आल्यास इथल्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड बालना मिळाली असती, स्थानिक चालक, मार्गदर्शक, दुकानदार सर्वांनाच फायदा झाला असता, आता मार्ग सरळ शिर्डीकडे गेल्याने आमचे नुकसान झाले आहे.

– सदानंद मोरडे, अध्यक्ष भूमि अभिलेख संघटना, पुणे जिल्हा

“आमचा द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला याचा 66 मोटा पुरवटा पुणे नाशिक दरम्यान होला रेल्वेमुळे माल पोहोचवणे स्वस्त आणि जलद झाले असते. आता पुन्हा महागडे ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहावे लागेल.

संजय पवळे, सरपंच पेठ

 

 

 

 

Web Title: Ambegaon junnar railway route change triggers discontent in tourism and industry sectors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nashik Politics
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…
1

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे अधिवेशन चालणार आठवडाभर; फक्त एका दिवसाचा खर्च येणार…

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप
2

Duplicate Voters Allegation: एकाच नावासमोर वेगवेगळे फोटो, एकाच पत्त्यावर १००-१५० मतदार; कळमकरांचे गंभीर आरोप

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
3

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा
4

Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.