खासदार सुप्रिया सुळे, खासदार कंगना राणौत आणि खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला (फोटो - सोशल मीडिया)
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप खासदार कंगना राणौत आणि तृणमृल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतर वेळी राजकीय विरोध दर्शवणाऱ्या आणि सभागृह गाजवणाऱ्या या महिला नेत्या एकत्रित डान्स करताना दिसून आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील असल्याचा दावा केला जात आहे.
Kangana Ranaut, Mahua Moitra, Supriya Sule performing in wedding of Naveen Jindal’s daughter pic.twitter.com/lARD6SVRuU — Angoori (@Rodrigo60776560) December 6, 2025
हे देखील वाचा : गोवा नाईटक्लब आग प्रकरणी क्लब मॅनेजरला अटक, मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी
यापूर्वी देखील तिन्ही महिला नेत्यांना डान्सची तालीम करताना फोटो व्हायरल झाला होता. यावेळी देखील जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता डान्स व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये ओम शांती ओम या हिंदी चित्रपटातील गाण्यावर तिन्ही महिला खासदार डान्स करत आहेत. यावेळी खासदार नवीन जिंदाल हे देखील स्टेज मध्यभागी उभे असल्याचे दिसून येत आहे. लग्नाच्या संगीत कार्यक्रमातील या व्हिडिओवरुन चर्चांना उधाण आले. यापूर्वी खासदार कंगना राणौत हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रॅक्टिकचा फोटो शेअर केला होता. यानंतर आता डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत
कंगना रणौत यांनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही हँडल्सवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. डॉ. निमो यादव या हँडलवरून केलेल्या पोस्टला एक लाखाहून अधिक व्यूज मिळाल्या आहेत. “अशाप्रकारे राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात. अशा आशयाची पोस्ट या अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती
हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, सुप्रिया सुळे, महुआ मोईत्रा यांच्यासारखे बिगर भाजपाचे खासदार हे कंगना रणोत यांच्याबरोबर नृत्य करत आहेत. याच कंगना रणोत योनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होत. आणखी एका हँडलवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. अमॉक या हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा दुटप्पीपणाचा कळस आहे.
This is how politicians fool all of you. In a few days, the wedding of BJP MP Naveen Jindal’s daughter will take place. And suddenly MPs from different parties forgot their ideology and everything BJP is doing to this country and they started rehearsing dance performances for… pic.twitter.com/3Zo141dwEC — Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) December 4, 2025






