KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल (Photo Credit - X)
विकास कामांसाठी दुजाभाव
प्रभाग क्रमांक ११ येथील विकास कामाकरीता शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाचे भूमीपूजन माजी नगरसेवक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्यासह माजी नगरसेविका नमिता पाटील, उपशहर प्रमुख अंकूश जोगदंड, विभाग प्रमुख राम तरे, शाखा प्रमुख रोहन कोट आदी मान्यवर उपस्थित होते. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमा पश्चात माजी नगरसेवक पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला.
विरोध न करता जागा महापालिकेस, पण विकास नाही
माजी नगरसेवक पाटील यांनी सांगितले की, १०० एमएलडी क्षमतेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीस स्थानिक भूमीपूत्रांनी जागा दिली. त्यानंतर आणखीन एक २०० एमएलडी क्षमतेचा पाणी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठीही भूमीपूत्रांच्या जागा महापालिकेने घेतल्या आहे. विकास कामाला भूमीपूत्रांनी जरा देखील विरोध न करता जागा महापालिकेस दिल्या. मात्र मोहिली परिसरात रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याठिकाणी डीपी रस्ते झाले पाहिजेत. महापालिका प्रकल्पासाठी जागा घेते. त्या भागातील विकासाकडे दुर्लक्ष करते. विकासाबाबत दुजाभाव केला जातो. या कडे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
महापालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्र हा ग्रामीण परिसर आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबाबत महापालिकेकडून दुजाभाव केला जातो. या भागातील डीपी रस्ते १९९५ पासून आहे तसेच आहे. ते विकसीत करण्यात आलेली नाही. महापालिकेने रस्ते विकासासठी निधीची तरतूद केली नाही. काही ठिकाणी केलेली तरतूद ही तुटपूंजी होती. प्रशासकीय राजवटीत रस्ते विकासासाठी निधी मिळाला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
हे देखील वाचा: Dombivali भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
निधी प्राप्त होताच ही रस्त्याची कामे मार्गी लागतील
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह आमदार विश्वनााथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. येत्या काही दिवसात या डीपी रस्त्यासाठी लवकरच निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. निधी प्राप्त होताच ही रस्त्याची कामे मार्गी लागतील. दरम्यान आज बल्याणी, मोहिली, तिपन्नानगर या प्रभागातील विकास कामाकरीता दिलेल्या दीड कोटीच्या निधीतून होत असलेल्या कामाचे भूमीपूजन माजी नगरसेवक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.






