Amit Shah in Nanded : महाराष्ट्राचा विकास एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच करू शकतात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार या राज्याचा विकास करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता आम्हाला मतदान करावे असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत केले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला 7 लाख कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगितले.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: "After seeing today's gathering here, there will hardly be any doubt in anyone's mind that Prataprao Chikhalikar (BJP's Nanded Lok Sabha candidate) will win with a record-breaking margin," says Union Home Minister and BJP leader Amit Shah… pic.twitter.com/JWjtXEajP9
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2024
विरोधकांवर जोरदार टीकास्त्र
नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये आले होते. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत, शरद पवार, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाहीत, अशी खरमरीत टीका केली.
मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन
नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ अमित शहा यांनी नांदेडमधून नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करून प्रतापराव पाटलांना दिल्लीत पाठवण्याचे आवाहन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले अमित शाह?
वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे.
मोदींनी शत्रूंना घरात घुसून मारलं
खर्गे म्हणतात काश्मीरचा अन् महाराष्ट्राचा काय संबंध? पण काश्मीर हे पूर्ण देशाचं आहे, याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार आहे. काँग्रेसने 70 वर्षात 370 कलम हटवले नाही. दहा वर्ष मनमोहन सोनिया यांनी सरकार चालवले, तेव्हा बाहेरून लोक यायचे अन् इथे घातपात करायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात्त घुसून त्यांना मारले. जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आहे, आमच्या वाटेला जर कुणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदींच इंजिन अन् आपली विकासाची गाडी आहे. दुसरीकडे गाडी आहे पण राहुल गांधींचं बंद पडलेलं इंजिन त्याला जोडलेलं आहे. सगळेच म्हणतात मी इंजिन आहे, पण इंजिनमध्ये एकाच ड्रायव्हरची जागा असते. ती गाडी आपल्याला विकासाकडे घेऊन जात नाही . आपली मोदींची गाडी हीच विकासाची गाडी आहे.
अशोकराव तुम्ही इकडे आले आणि बघा काँग्रेसची अवस्था काय झाली आहे. दोघे ही इथे एकत्र आलेत त्यामुळे आता चिंता नाही. सामान्य माणसांना विकासाकडे घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा जाहीर केली हे काँग्रेसला माहितीच नाही. मागच्या लोकसभेत काँग्रेसची एक जागा आली होती, आता त्यांना शून्यावर आणायचं आहे.