फोटो सौजन्य: Pinterest
हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Celerio ही कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कमी खर्चात जास्त मायलेज देणाऱ्या या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार घरी आणता येऊ शकते. मात्र, या कारसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
मारुती सुजुकी सेलेरिओ CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.98 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास याची ऑन-रोड किंमत सुमारे 6.53 लाख रुपये होते. या रकमेत एक्स-शोरूम किंमतीव्यतिरिक्त सुमारे 25 हजार रुपये RTO शुल्क आणि सुमारे 25 हजार रुपये विमा खर्चाचा समावेश आहे.
जर तुम्ही सेलेरिओ CNG खरेदी करताना 2 लाख रुपये डाउन पेमेंट भरले, तर उर्वरित 4.53 लाख रुपये बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील. बँकेकडून हे कर्ज 9 टक्के व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी मिळाल्यास, तुम्हाला दरमहा सुमारे 7,281 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार
7 वर्षांसाठी 4.53लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, तुम्ही दरमहा 7,281 रुपये EMI भराल. या कालावधीत केवळ व्याजापोटी सुमारे 1.59 लाख रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून Maruti Celerio CNG ची एकूण किंमत सुमारे 8.11 लाख रुपये होते.
हॅचबॅक सेगमेंटमध्ये Maruti Celerio CNG ची थेट स्पर्धा Maruti S-Presso, Renault Kwid, Maruti Wagon R आणि Hyundai Grand i10 Nios या कार्ससोबत होते. किफायतशीर किंमत, कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे सेलेरिओ CNG हा बजेट ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरतो.






