मीरा-भाईंदर महापालिकेच्या २४ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ
वेबसाइटवरही याद्या उपलब्ध असल्या तरी, विविध प्रभागांत मतदारांची’अदलाबदल’ झाल्याने पहिल्याच दिवशी तीन हरकती पालिकेकडे दाखल झाल्याची माहिती मिळाली. महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा मतदार याद्यांवर आधारित प्रभागनिहाय विभागणीचे काम महापालिकेच्या कर विभागाने केले आहे. त्यामुळे संबंधित चौकशी करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. प्रारूप मतदार याद्यांतील मोठ्या प्रमाणातील गोंधळामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रारूप कती व वण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांची या आहेत.
भाजपावर ‘मतांचा खेळ’ केल्याचा आरोप
जुबेर इनामदार यानी ‘भाजप आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांची बौरी करण्याचा पुरावा’ असल्याचा आरोप केला, मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनीही असा आरोप केला की, ‘विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. बोगस मतदार वगळलेले नाहीत. उलट लक्ष विचलित करण्यासाठी प्रभागांत गोधळ निर्माण केला आहे.’
उबाठा सेनेकडूनही संताप व्यक्त
महिला जिल्हा संघटक नीलम दवण यांनी प्रभाग ३ मधील इमारती प्रभाग ४ आणि ११ मध्ये, तर इतर प्रभागातील इमारती प्रभाग ३ मध्ये टाकल्याचा आरोप केला. प्रभाग १०, ४, ११, ८, १७, २१, १६, ९, १९, २२ अशा अनेक प्रभागांत नावांची अदलाबदल केल्याचेही त्यांनी सांगितले,
उबाठा सेनेकडूनही संताप व्यक्त
महिला जिल्हा संघटक नीलम दवण यांनी प्रभाग ३ मधील इमारती प्रभाग ४ आणि ११ मध्ये, तर इतर प्रभागातील इमारती प्रभाग ३ मध्ये टाकल्याचा आरोप केला. प्रभाग १०, ४, ११, ८, १७, २१, १६, ९, १९, २२ अशा अनेक प्रभागांत नावांची अदलाबदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच
छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरचकॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी नगरसेवक राजीव मेहरा आणि जुबेर इनामदार यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन गंभीर तक्रारी केल्या, ‘सुधारित याद्या आधी प्रकाशित करा आणि मग हरकतीसाठी मुदत वाढवा,’ अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आयुक्तांनी सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले असले तरी, काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगातही तक्रार दाखल केली आहे.






