मुस्लीम मुलाने नेले अल्पवयीन मुलीला नेले पळवून, आईबापाच्या जीवाची घालमेल आणि पोलीसांचा तपास
महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचार यामुद्द्यांवर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे,” असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलते होते. याचदरम्यान आता अमरावतीत लव्ह जिहाद प्रकरण समोर आला आहे.
अमरावती जिल्यातून धक्कादायक घटना समोर आली असून २२ सप्टेंबर 2024 रोजी अमरावतीमधील नवी वस्ती बडनेरा येथे राहणाऱ्या 22 वर्षीय आरोपी नामे मोहम्मद कासीम मोहम्मद शकीब याने 12 वर्षीय शितल तेटू हिला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे अपराध क्रमांक 579/2024 कलम 137(2) बीएनएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील नमुद आरोपीने पिडीत अल्पवयीन मुलीला 23 सप्टेंबरला मुंबई येथील हाजी अली दर्गा परिसर येथे आणलेले आहे. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे. परंतु आरोपीने आपला मोबाईल बंद करून ठेवलेला असल्याने पिडीत मुलगी व आरोपी अद्याप यांचा शोध लागला नाही. अमरावती शहर येथील तपासपथके त्यांचा मुंबई येथे शोध घेत आहे. तरी सदर पिडीत मुलगी व आरोपीचा शोध सुरु असून तुम्हाला दिसून आल्यास कळवावे असा मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती प्राप्त झाली. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून 152 प्रकरणे समोर आली आहेत. “समिती प्रसिद्ध झाल्यानंतर, कुटुंबातील काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, बहुतेक प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांशी संवाद तुटला होता.