Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीमध्ये एनएसयुआयचा पेपरफुटी निषेधार्थ मशाल मोर्चा, मोदी सरकारने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला – यशोमती ठाकूर

‘नीट’ आणि ‘सीबीएसई’परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या गंभीर गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.५) रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती येथे भारतीय राष्ट्रीय छात्र संघातर्फे (एनएसयुआय) भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By विवेक
Updated On: Jun 06, 2026 | 09:38 PM
NSUI holds Mashaal Morcha protest in Amravati against paper leak, CBSE paper leak, NEET Paper Leak, Yashomati Thakur, Congress,

NSUI holds Mashaal Morcha protest in Amravati against paper leak, CBSE paper leak, NEET Paper Leak, Yashomati Thakur, Congress,

Follow Us
Follow Us:

अमरावती, प्रतिनिधी: नीट आणि सीबीएसई परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन अभ्यास करतात, मात्र पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या परिश्रमांवर पाणी फिरत आहे. पेपरफुटी प्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदल्या केल्या जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

‘नीट’ आणि ‘सीबीएसई’परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या गंभीर गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.५) रोजी सायंकाळी ७.३० वाजता अमरावती येथे भारतीय राष्ट्रीय छात्र संघातर्फे (एनएसयुआय) भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मशाल मोर्चामध्ये एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, खासदार बळवंत वानखडे, माजी महिला व बालविकास मंत्री एँड. यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआयचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

‘कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,’ उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा

मोर्चाची सुरुवात शहरातील ऐतिहासिक इरविन चौक येथून करण्यात आली. आंदोलकांनी प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाली प्रज्वलित केल्या. हातात मशाली आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून जयस्तंभ चौकात पोहोचला. तिथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गभर आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे अमरावती शहर दणाणून गेले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, दोषींना तात्काळ कडक शिक्षा मिळावी आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील विश्वासार्हता व पारदर्शकता अबाधित राहावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मशाल मोर्चा काढण्यात आला होता. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकला जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला.

‘मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करा’; श्रीकांत शिंदे यांचा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निर्देश

Web Title: Nsui holds mashaal morcha protest in amravati against paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • amravati
  • neet paper leak
  • NSUI
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral
1

‘सर आम्हाला सोडून जाऊ नका…’; शिक्षकाचे ट्रान्सफर अन् मिठी मारून ढसाढसा रडले विद्यार्थी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.