कोक्रोच ना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल,' उद्धव ठाकरेंचा कॉक्रोचेसना पाठिंबा
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janta Party) जंतरमंतरवरील आंदोलनाला (Protest) आता सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. या परवानगीनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) सदस्यांनी आज शनिवारी (6 जून 2026) जंतर मंतर येथे आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलकांची मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आता या आंदोलनावरून नवे वक्तव्य केले असून त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली. त्यात ते म्हणाले, ““दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!” असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे: “दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे.
ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात… — Sanjay Raut (@rautsanjay61) June 6, 2026
आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून आदित्य ठाकरे म्हणाले, “नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) मध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी निर्माण केलेल्या गोंधळाबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज रस्त्यावर उतरलेले तरुण, हे आपल्या देशातील सूडबुद्धीच्या आणि लोकशाहीविरोधी राजवटीविरोधात नागरिकांनी आवाज उठवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. राजवटीने तुमचे लक्ष विचलित करण्याचे, दिशाभूल करण्याचे, तुमची बदनामी करण्याचे आणि तुम्हाला रोखून धरण्याचे सर्व प्रयत्न करूनही, आज रस्त्यावर उतरलेल्या त्या सर्वांना सलाम.”
The youth stepping out today, asking for Dharmendra Pradhan’s resignation for the mess he has created in NEET and CBSE is a big move forward in citizens speaking up against the regime in our country, that is vindictive and anti democratic. Kudos to all those who stepped out… — Aaditya Thackeray (@AUThackeray) June 6, 2026
एकीकडे दिल्लीत सीजेपी’च्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय मात्र चांगलेच चिंतेत होते. त्यातच अभिजीत दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टीची चळवळ सुरु केल्यापासून त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अभिजीत दिपके हे आज सकाळी अमेरिकेतून दिल्लीमध्ये दाखल झाले. एकीकडे जंतरमंतर मैदानात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा पोलीस प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.






