Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी

पूर्वी शेताच्या अगदी मध्यभागी जाऊन नोंद करावी लागत होती. आता या नियमात शिथिलता आणत २० मीटरच्या अंतरातूनही पीक पाहणी करता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 01:59 PM
ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी

ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी

Follow Us
Follow Us:

सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲप, नेटवर्क किंवा तांत्रिक अडचणींचा सामना करीत धावपळ करण्याची गरज राहणार नाही. गत काही वर्षांत ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या विविध समस्यांचा विचार करून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, १५ जुलैपासून राज्यभर नवीन पीक पाहणी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, तहसीलदारांकडून नियुक्त विशेष सहाय्यक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून सातबारा उताऱ्यावर अधिकृत नोंद करतील. त्यामुळे पीक कर्ज, पीक विमा, शासकीय अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसानभरपाईसाठी आवश्यक असलेली पीक नोंद अधिक अचूक आणि विश्वासार्ह होणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

याआधी शेतकऱ्यांना मोबाइल ॲपच्या माध्यमातून स्वतःच ई-पीक पाहणी करावी लागत होती. मात्र ग्रामीण भागात स्मार्टफोनचा अभाव, इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कची समस्या, वारंवार सर्व्हर डाऊन होणे, अक्षांश-रेखांश अचूक न मिळाल्याने फोटो अपलोड न होणे, तसेच तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहत होते. परिणामी अनेक पिकांची नोंद वेळेत होत नव्हती. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्थानिक महिला बचत गटातील महिलांचीही मदत घेतली जाणार आहे. आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना पीक पाहणीच्या कामात सहभागी केले जाणार आहे. याशिवाय, पीक पाहणीच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

पूर्वी शेताच्या अगदी मध्यभागी जाऊन नोंद करावी लागत होती. आता या नियमात शिथिलता आणत २० मीटरच्या अंतरातूनही पीक पाहणी करता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. दरम्यान, ही संपूर्ण व्यवस्था केंद्र सरकारच्या ‘ॲग्रिस्टॅक’ या डिजीटल कृषी परिसंस्थेशी जोडण्यात येत आहे. त्यामुळे पीक पाहणी पूर्ण होताच त्याची खात्रीशीर नोंद आणि कन्फर्मेशन संदेश थेट शेतकऱ्यांच्या मोबाइलवर पाठवला जाणार आहे.

नवीन पीक पाहणी व्यवस्थेची वैशिष्ट्ये

१५ जुलैपासून राज्यभर नवीन व्यवस्था लागू.तहसीलदार नियुक्त विशेष सहायक शेतावर जाऊन पाहणी करणार. पीक नोंद थेट सातबारा उताऱ्यावर केली जाणार.२० मीटर अंतरावरूनही पीक पाहणी करता येणार. पीक नोंदीनंतर मोबाईलवर मिळणार. मोबाइल ॲप, नेटवर्क आणि सर्व्हरच्या अडचणींपासून दिलासा.पीक कर्ज, पीक विमा, शासकीय योजनांसाठी अचूक पीक नोंद उपलब्ध.आपत्तीतील नैसर्गिक नुकसानभरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ. तांत्रिक ज्ञान नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीक नोंद सहज शक्य.

Amravati News: वृक्षांसाठी उभे राहिलेले हात जिंकले! आराखडा तयार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महामार्गावरील वृक्षतोड थांबली

८८ शेतकऱ्यांचा त्रास कमी करणे आणि सातबारावरील पिकांची ऑनलाइन नोंद अचूक होणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत शेतकऱ्यांनी नियुक्त सहायकांना सहकार्य करावे, विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी (महसूल) असे मत मांडले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: An end to technical issues in e crop surveys relief for farmers physical crop inspection will now take place right at the farm boundary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • agricultural
  • Amaravati
  • farmer
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय
1

Amaravati News: आश्रमशाळांना ‘वीज अरेस्टर’ कवच! संच बसविण्यासाठी ई-निविदेला मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
2

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
3

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक! राज्यातील अनेक भागांत बरसला, २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुठे-कुठे बरसणार?
4

महाराष्ट्रात पावसाचं जोरदार कमबॅक! राज्यातील अनेक भागांत बरसला, २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान कुठे-कुठे बरसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.